मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Burning Car VIDEO: जळगावात बर्निंग कारचा थरार, चालत्या कारने अचानक घेतला पेट

Burning Car VIDEO: जळगावात बर्निंग कारचा थरार, चालत्या कारने अचानक घेतला पेट

जळगावात बर्निंग कारचा थरार; चालत्या कारने अचानक घेतला पेट, पाहा VIDEO

जळगावात बर्निंग कारचा थरार; चालत्या कारने अचानक घेतला पेट, पाहा VIDEO

Running car caught fire in Jalgoan: धावत्या कारचने अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत इंडिका कार संपूर्णपणे जळून खाक झाली आहे.

जळगाव, 5 डिसेंबर : भुसावळ तालुक्यातील जाडगाव वरणगाव रोडवर धावत्या इंडिका कारने (Indica car caught fire in Jalgaon) अचानक पेट घेतला. सुदावाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र, या आगीत इंडिका कार संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. कारमधून ड्रायव्हर एकटाच प्रवास करत होता. कार ने पेट घेतल्याचे चालकाच्या निदर्शनास आल्यावर तो तात्काळ गाडीतून खाली उतरला आणि मोठी त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. (Running car caught fire in Jalgaon watch video)

भुसावळ तालुक्यातील वरणगाव जळगाव रोडवर काही दिवसापासून बंद अवस्थेत ही इंडिका कार होती. कारचे मालक ईश्वर सपकाळे ही इंडिका कार आपल्या स्वतःच्या घरी घेऊन जात होते. त्यांनी गाडी सुरू केली आणि काही किलोमीटरचा पल्लाही गाठला. मात्र, प्रवासा दरम्यान अचानक गाडीने पेट घेतला. गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच त्यांनी गाडी थांबवली आणि गाडीतून खाली उतरले.

धावत्या गाडीला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी बघ्यांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती. गाडीने पेट घेताच अवघ्या काही क्षणांतच इंडिका कार संपूर्ण पणे जळून खाक झाली. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये संपूर्ण घटना शूट केली असून त्याचे व्हिडीओ आता समोर आले आहेत.

वाचा : Electric Vehicle ने केवळ एका रुपयांत होईल 1 किलोमीटरचा प्रवास, नितिन गडकरींची माहिती

चिमुकल्यांना बसची धडक

दुसऱ्या एका अपघातात एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या देऊळगाव येथे जाणाऱ्या दोन लहान भावंडांना खाजगी बसने धडक दिली. या अपघातात आर्यन नसीब तडवी या 3 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून रिहान नसीब तडवी हा 5 वर्षीय बालक गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान जखमी बालकास बुलढाणा येथे उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर जमावाने बसची तोडफोड केली असून घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस पाचोरा येथील अतिरिक्त पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बस चालक व वाहक यास ताब्यात घेतले आहे.

कोल्हापुरात भर रस्त्यात पेटली कार

एप्रिल महिन्यात कोल्हापूर शहरातल्या व्हिनस कॉर्नर परिसरात एका कारने पेट घेतला होता. त्यावेळी लॉकडाऊन असल्यानं बहुतांश दुकानं ही बंद होती. त्यामुळं रस्त्याच्या बाजुला कार आणि इतर गाड्या उभ्या केलेल्या पाहायला गोची. अशीच एक कार व्हिनस कॉर्नर परिसरात उभी होती. कारच्या जवळच रस्त्याच्या कडेला असलेला कचराही पेटवला जात होता. हा कचरा पेटवल्यानंतर कचऱ्याची आग पसरत गाडीपर्यंत गेली आणि गाडीच्या मागच्या भागाला आग लागली. गाडीला आग लागल्यानंतर गाडीनं वेगानं पेट घेतला आणि मागचा भाग चांगलाच जळू लागला. गाडीला लागलेल्या या आगीचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली होती.

First published:

Tags: Car, Fire, Jalgaon