सामूहिक नांगरणी स्पर्धा अंगलट.. भास्कर जाधवांच्या पुत्रासह 25 जणांवर गुन्हा

सामूहिक नांगरणी स्पर्धा अंगलट.. भास्कर जाधवांच्या पुत्रासह 25 जणांवर गुन्हा

गुहागरमधील शृंगारतळी येथे सामूहिक नांगरणी स्पर्धेच्या नावाखाली घेतलेली स्पर्धा आयोजकांसह स्पर्धकांच्या चांगलीच अंगलट आली आहे.

  • Share this:

स्वप्निल घाग, (प्रतिनिधी)

रत्नागिरी, 17 ऑगस्ट- गुहागरमधील शृंगारतळी येथे सामूहिक नांगरणी स्पर्धेच्या नावाखाली घेतलेली स्पर्धा आयोजकांसह स्पर्धकांच्या चांगलीच अंगलट आली आहे. मुक्या प्राण्यांना क्रूरपणे वागवल्याप्रकरणी गुहागर पोलिसांनी आयोजकांसह एकूण 25 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात राष्ट्रवादीचे नेत आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांचा पुत्र विक्रांत जाधव याचाही समावेश आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात संगमेश्वर येथे देखील अशाच प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आली होली. त्यात एक बैल बिथरल्यामुळे 5 ते सहा जण थोडक्यात बचावले होते. खरंतर याघटनेनंतर पोलिसांनी जिल्ह्यात होणाऱ्या नांगरणी स्पर्धेची माहिती घेऊन त्या रोखणे गरजेचे होते. मात्र, गुहागरमधील या स्पर्धांची माहिती सार्वजनिक असूनही त्यावर वेळेत का कारवाई झाली नाही, असा सवाल उपस्थित केरण्यात आली आहे. 'न्यूज18 लोकमत'ने या स्पर्धेचे वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाला जाग आली. अखेर शनिवारी या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्ष विनायक मुळे आणि इम्रान घारे यांसह एकूण 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आयोजक आणि स्पर्धकांवर गुन्हे दाखल होत असले तरीही अश्या जीवघेण्या स्पर्धा कायदेशीररित्या बंद करून अशा स्पर्धा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे बनले आहे.

राजकीय नेत्यांचा अट्टाहास, मुक्या जीवांचा छळ

संगमेश्वरमधल्या नांगरणी स्पर्धेने अशा स्पर्धा किती जीवघेण्या ठरू शकतात हे समोर आले आहे. पण तरीही कोकणातील नेत्यांकडून नांगरणी स्पर्धा रुजवण्यासाठी अट्टाहास सुरू आहे. मुक्या जीवांचा छळ आणि शेतकऱ्यांच्या जीवाचा धोका मात्र त्यांना दिसत नाही. कारण नेत्यांना अशा स्पर्धामधून आता राजकीय नांगरणी साधायची असल्याचे दिसत आहे.

डॉन आहे का तू? पोलिसांनी तरुणाला पट्ट्याने झोड-झोडपलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2019 07:35 PM IST

ताज्या बातम्या