मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO: बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडाला, गनिमी कावा करत झरे गावात शर्यत संपन्न

VIDEO: बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडाला, गनिमी कावा करत झरे गावात शर्यत संपन्न

Bailgada Sharyat in Sangli: सांगलीतील झरे गावात बैलगाडा शर्यत संपन्न झाली आहे. पोलिसांनाही शर्यतीच्या ठिकाणचा तपास लागला नाही.

Bailgada Sharyat in Sangli: सांगलीतील झरे गावात बैलगाडा शर्यत संपन्न झाली आहे. पोलिसांनाही शर्यतीच्या ठिकाणचा तपास लागला नाही.

Bailgada Sharyat in Sangli: सांगलीतील झरे गावात बैलगाडा शर्यत संपन्न झाली आहे. पोलिसांनाही शर्यतीच्या ठिकाणचा तपास लागला नाही.

सांगली, 20 ऑगस्ट : राज्यत बैलगाडा शर्यतीला (Bullock Cart Race) परवानगी नसतानाही बैलगाडा शर्यतीचं आयोजन सांगलीत (Sangli) करण्यात आलं आणि पोलिसांना गुंगारा देत ही शर्यत संपन्न पडल्याचं पहायला मिळत आहे. सांगली पोलिसांनी जंग जंग पछाडलेला नंतरही गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी बैलगाडा शर्यत भरवून दाखवली आहे. गनिमी कावा करत चार वेगवेगळ्या ठिकाणी शर्यतीची तयारी करून प्रत्यक्षात मात्र शर्यत वेगळ्याच ठिकाणी घेतली आणि पोलिसांनाही शर्यतीच्या ठिकाणचा तपास लागला नाही.

यासोबतच ज्या शेतकऱ्यांची बैल शर्यतीत धावणार होती त्या मोजक्याच शेतकऱ्यांना या शर्यतीच्या ठिकाणाची कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे रात्री बारा वाजल्यापासून हे शेतकरी शर्यतीच्या मैदानावर माळावर येऊन थांबले होते. सकाळी या ठिकाणाची माहिती काही समर्थकांना देत रानातल्या रस्त्यांनी सगळे शेतकरी शर्यतीच्या ठिकाणी पोहोचले आणि तीन वेळा शर्यतीची बारी भरवण्यात आली.

सांगलीतील झरे गावाच्या हद्दीत ही बैलगाडा शर्यत भरवण्यात आली. या शर्यतीत बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा चालक-मालक तर उपस्थित होतेच त्यासोबतच शेकडोंच्या संख्येत नागरिक सुद्धा शर्यतीच्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पहायला मिळालं.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं मात्र, ही शर्यत होऊ नये यासाठी सांगलीतील नऊ गावांत संचारबंदी सुद्धा लागू केली होती. ही बैलगाडी शर्यत होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. तरी सुद्धा बैलगाडी दुसऱ्या ठिकाणी भरवण्यात आली. मात्र, असे असतानाही गोपीचंद पडळकर यांनी गनिमी कावा करत बैलगाडा शर्यत संपन्न करुन दाखवली आहे. आता पडळकर यांनी सांगली पोलिसांना शर्यत भरवून जे आव्हान दिलंय त्यावर सांगली पोलीस नेमकं काय करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:
top videos

    Tags: Sangli