मगरीने केला शेतकऱ्यावर हल्ला, पण बळीराजाच्या मदतीला धावून येत बैलाने वाचवला जीव

मगरीने केला शेतकऱ्यावर हल्ला, पण बळीराजाच्या मदतीला धावून येत बैलाने वाचवला जीव

मुक्या जीवामुळे शेतकऱ्याचा जीव वाचल्याने कोल्हापूरमध्ये घडलेल्या एका घटनेची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 21 फेब्रुवारी : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याजवळ सातवे येथील वारणा नदी काठावर बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या महेश काटे या शेतकऱ्यावर मगरीने हल्ला केला. या हल्ल्यावेळी बैलाने उलट बाजूला ओढल्यामुळे महेश काटे या शेतकऱ्याचे प्राण वाचले आहेत. आज दुपारी ही घटना घडली असून मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याला उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले आहे.

सातवे येथील वाण्याची मळी या परिसरात महेश आपल्या बैलांच्या साह्याने शेती मशागत करण्यासाठी गेला होता. दुपारी विश्रांतीपूर्वी बैलांना पाणी पाजण्यासाठी तो नदीवर घेऊन गेला. बैल पाणी पीत असताना तो शेतकरीही बैलांना धुण्यासाठी नदीपात्रात उतरला. त्यावेळी नदीतील एका मगरीने त्याच्या डाव्या पायाला पकडले आणि त्याला पाण्यात ओढण्यास सुरुवात केली.

मगरीने हल्ला चढवला तेव्हा शेतकऱ्याचा हात बैलाच्या दाव्याला जखडला होता. बैल पाण्यात असताना मगरीने पाण्यातच महेशचा पाय पकडल्यामुळे त्याला बाहेर पडणे शक्य होत नव्हते. पण तेव्हाच अचानक बैलाने आपला मोर्चा उलट दिशेला वळवून महेशला नदी बाहेर ओढून काढले. त्यानंतर महेशने आरडा -ओरडा केल्याने शेतातील शेतकरी गोळा झाले आणि त्याला उपचारासाठी खासगी दवाखान्यात घेऊन गेले. दवाखाना परिसरात नातेवाईक व मित्रमंडळी यांनी गर्दी केली होती.

परीक्षेच्या काळात मशिदीवरचे लाऊड स्पीकर बंद करा, शिवसेना नेत्याचं गृहमंत्र्यांना पत्र

दरम्यान, शेतकरी आणि शेतीची मशागत करणाऱ्या बैलांचं भावनिक नातं यापूर्वी अनेक घटनांतून समोर आलं आहे. मात्र एका मुक्या जीवामुळे शेतकऱ्याचा जीव वाचल्याने कोल्हापूरमध्ये घडलेल्या एका घटनेची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

First published: February 21, 2020, 6:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading