मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मूळ कागदपत्रांसाठी लढला, स्वत:ला पेटवून घेतलं, बुलढाण्यात विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल

मूळ कागदपत्रांसाठी लढला, स्वत:ला पेटवून घेतलं, बुलढाण्यात विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल

बुलढाणा जिल्हा रुग्णालय

बुलढाणा जिल्हा रुग्णालय

बुलढाणा जिल्ह्यातून धक्कादायक बातमी येत आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Buldana, India
  • Published by:  Chetan Patil

राहुल खंदारे, बुलढाणा, 7 ऑक्टोबर : बुलढाणा जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील गोडे कृषी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या भावाला मूळ कागदपत्र मिळत नसल्याने संतापून जीवन मुपडे नामक युवकाने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले होते. उपचारादरम्यान या युवकाचा आता मृत्यू झाला आहे. त्यामुळे शिक्षणाच्या बाजारीकरणाचा जीवन मुपडे हा पहिला बळी ठरलाय. एकीकडे शिक्षण मोफत आणि सक्तीचे मिळावं, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे पैशांच्या लालसेपायी या विद्यार्थ्याचे कागदपत्र अडवून ठेवण्यात आले होते.

बुलढाणा जिल्ह्यातील भाजपच्या योगेंद्र गोडे यांचं हे कृषी महाविद्यालय असल्याचं समोर आला आहे. गोडे कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी विशाल मिसाळ हा मूळचा जालन्याचा. त्याने गोडे कृषी महाविद्यालयात आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयाकडून त्याला कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे विशाल आणि जीवन यांनी संस्थाअध्यक्ष असेल प्राचार्य असेल यांना कागदपत्रांसाठी विनवण्या केल्या. मात्र अंतिम वर्षाची स्कॉलरशिप न मिळाल्याने या विद्यार्थ्याला कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे संतापून विशालचा भाऊ जीवन मुपडे याने स्वतःवर पेट्रोल ओतून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तो तब्बल 40 टक्के भाजला गेला.

(कुत्र्यावर गोळी झाडली, पण घरकाम करणाऱ्या महिलेची काय चूक? नालासोपऱ्यात खळबळ)

यादरम्यान नांदेड येथे त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या शोषणाचा, शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या जीवन हा पहिला बळी ठरला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस यंत्रनाही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. 27 सप्टेंबरला या जीवनने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतलं, तो मृत्यूची झुंज देत होता. मात्र ज्यांच्या त्रासापायी या विद्यार्थ्याने टोकाचा निर्णय घेतला त्यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलिसांनी साधा गुन्हाही दाखल करून घेतला नाही. उलट अकलेचे तारे तोडत निराशेत स्वत:ला संपवणाऱ्या जीवन विरोधातच बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणात जीवनचा मृत्यू झाला आहे. अजूनही या विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या शिक्षण संस्था तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यावर कुठल्याच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाहीय. त्यामुळे या राज्यात विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का? हा खरा प्रश्न आहे.

First published: