शेतीची नोंद नाही, पण विकली हजारो क्विंटल तूर

शेतीची नोंद नाही, पण विकली हजारो क्विंटल तूर

ज्यांच्या नावे सातबाराच नाही अशा शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची हजारो क्विंटल तूर विकलीये.

  • Share this:

03 मे : बुलडाण्याच्या शेगाव बाजार समितीत मोठा तूर घोटाळा झालाय. ज्यांच्या नावे सातबाराच नाही अशा शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची हजारो क्विंटल तूर विकलीये.

सात बारा नसलेल्या आणि एक हजार क्विंटल तूर विकलेल्या दहा शेतकऱ्यांची नावं आयबीएन लोकमतच्या हाती लागलीये. विना सातबारा तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दोनशेच्या घरात असल्याची माहिती बाजार समितल्या सूत्रांनी दिलीये.

धक्कादायक बाब म्हणजे बाजार समितीचे काही पदाधिकारीच या घोटाळ्यात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. बाजार समितीचे संचालक शेषराव महादेव पहुरकर यांनी स्वतः शंभर क्विंटल तूर विकलीये.

शेतीची नोंद नाही, पण तूर विकली

- दादाराव मुकुंदराव मारोडे - 120 क्विंटल

- ऋषिकेश पंजाबराव सहस्त्रबुद्धे - 80 क्विंटल

- पंकज वसंत कंकाळे - 109 क्विंटल

- पांडुरंग मनोहर उमाळे - 100 क्विंटल

- सोनू ललित चांडक - 100 क्विंटल

- कैलास शामराव शेंगोकार - 103 क्विंटल

- महादेव रावजी ठाकरे - 100 क्विंटल

- विश्वास नरहरी पाटील - 100 क्विंटल

- नंदकिशोर बालकिशोर डागा - 195 क्विंटल

- प्रमोद पुरुषोत्तम सहस्त्रबुद्धे 106 क्विंटल

First published: May 3, 2017, 9:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading