आरक्षण असून सुद्धा एकाची आत्महत्या,बनियानीवर लिहिले कारण

आरक्षण असून सुद्धा एकाची आत्महत्या,बनियानीवर लिहिले कारण

गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न ही केल्याचं गावकरी सांगतात मात्र त्यांना वेळीच अडवून आत्महत्या करण्यापासून रोखण्यात आले होते.

  • Share this:

प्रफुल्ल खंदारे, बुलडाणा, 11 आॅगस्ट : आरक्षण असून सुद्धा जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील  एकाने  गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले आहे. एकीकडे राज्यात  मराठा आरक्षणासाठी  मराठा समाज रस्त्यावर उतरला असल्याचे चित्र असताना दुसरीकडे  आरक्षण असून सुद्धा त्याचा फायदा घेण्यासाठी जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने एकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याच्या भानखेड या गावातील कोळी समाजाच्या माधव एकनाथ वाघ वय 42 वर्षे यांनी आपल्या राहत्या शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अत्यंत धक्कादायक आहे माधव वाघ हे कोळी समाजाचे असून गेल्या अनेक दिवसांपासून जात प्रमाणपत्रासाठी सरकारी दप्तराचे ओटी झिजवत होते. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना वेळोवेळी नकारात्मक उत्तरे मिळत होते. त्यामुळे आरक्षण असून सुद्धा त्याचा फायदा घेण्यासाठी लागणारे जात प्रमाणपत्र मिळत नसल्याचे पाहून अनेकदा त्यांनी यासंबंधी आवाज उठवण्यासाठी अनेकांना सांगितलं मात्र, त्यांच्या या मागणीकडे कोणी लक्ष देत नसल्याने त्यांनी आत्मदहनाचा निश्चय केला.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न ही केल्याचं गावकरी सांगतात मात्र त्यांना वेळीच अडवून आत्महत्या करण्यापासून रोखण्यात आले होते. मात्र, आज दुपारी त्यांनी आपल्या शेतात जाऊन स्वतःच्या अंगातील शर्ट बनियन आणि अंगावर आरक्षणाचा मजकूर लिहून झाडाला फाशी घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे भानखेड गावात शोककळा पसरली आहे. माधव वाघ यांच्या या पावलामुळे समाज बांधव मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहे आणि माधव वाघ यांचे बलिदान वाया जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं याप्रकरणी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

First published: August 11, 2018, 11:17 PM IST

ताज्या बातम्या