Home /News /maharashtra /

Accident CCTV: बुलढाण्यात भरधाव कारची चिमुकल्याला धडक, अंगावर काटा आणणारा Shocking VIDEO आला समोर

Accident CCTV: बुलढाण्यात भरधाव कारची चिमुकल्याला धडक, अंगावर काटा आणणारा Shocking VIDEO आला समोर

भरधाव कारची चिमुकल्याला धडक, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO आला समोर

भरधाव कारची चिमुकल्याला धडक, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO आला समोर

पुन्हा एकदा भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. हा अपघात बुलढाण्यात घडला असून घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. भरधाव कारने चिमुकल्याला जोरदार धडक दिल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे.

    राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलढाणा, 27 जानेवारी : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील (Mehkar Taluka Buldhana) वरवंड येथे रस्ता ओलांडणाऱ्या एका 8 वर्षीय लहान चिमुकल्याला एका भरधाव कारने जोरदार धडक (speeding car hits 8 year old child) दिली. अपघातानंतरही कार चालक भरधाव गाडी चालवत पुढे निघून गेला आहे. या अपघातात हा चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर डॉ खुरद यांच्या खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. ही संपूर्ण घटना त्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (Speeding car hits 8 year old child in Buldhana, incident caught in CCTV) सीसीटीव्हीत दिसत आहे की, एक चिमुकला रस्ता ओलांडत होता आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव कारने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, तो चिमुकला थेट बाजूला फेकला गेला. या अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावर न थांबता पळ काढला आहे. या अपघातानंतर वरवंडच्या या मार्गावर स्पीड ब्रेकर लावून सुसाट वाहणाऱ्या वाहनांवर आळा घालण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. कोळसा भरलेली ट्रॉली झोपडीवर कोसळली; 3 बहिणींचा मृत्यू भिवंडीत एक भीषण अपघात झाला आहे. कोळसा भरलेल्या ट्रकची ट्रॉली वीटभट्टीच्या शेजारी असलेल्या झोपडीवर कोसळली. या दुर्घघटनेत तीन बहिणींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोळसा भरलेली ट्रॉली झोपडीवर कोसळल्याने संपूर्ण झोपडी कोळशाखाली गाडली गेली. या घटनेने एकच खळबळ उडाली. तात्काळ मजुरांनी एकत्र येत कोळसा बाजुला करण्यास सुरुवात केली. मात्र, दुर्दैवाने या अपघातात तीन बहिणींचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाचा : मुंबई अस्थिर करण्याऐवजी विकासाकडे लक्ष द्या, महापौरांचा भाजपला टोला तिन्ही बहिणी झोपल्या होत्या टेंभिवली गावात असलेल्या वीटभट्टीवर कोळसा आवश्यक असतो. त्यासाठी तेथे ट्रकमधून सातत्याने कोळसा आणला जात असतो. मंगळवारीही कोळसा भरलेला ट्रक वीटभट्टीवर आला. ट्रकमधून कोळसा खाली करत असताना शॉकअप्सर तुटला आणि ट्रकची ट्रॉली थेट शेजारील झोपडीवर कोसळली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी झोपडीत मजुराची पत्नी आणि तीन मुले होती. दुर्दैवाने या अपघातात तीन बहिणींचा मृत्यू झाला. तिन्ही बहिणी झोपडीत झोपल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Buldhana news, Cctv, Crime

    पुढील बातम्या