मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /WhatsApp ग्रुपवर अश्लील मेसेज केल्याप्रकरणी शेगावचे गटशिक्षणाधिकारी निलंबित

WhatsApp ग्रुपवर अश्लील मेसेज केल्याप्रकरणी शेगावचे गटशिक्षणाधिकारी निलंबित

WhatsApp Mobile नंबरशी जोडलेले सर्व बँक अकाउंट्स लिस्टमध्ये दिसतील.

WhatsApp Mobile नंबरशी जोडलेले सर्व बँक अकाउंट्स लिस्टमध्ये दिसतील.

रात्रीच्या वेळेस शेगाव पंचायत समितीअंतर्गत कार्यालयीन कामकाजसाठी असलेल्या व्हॉट्सॲप गृपवर अश्लील मेसेज करण्यात आला होता.

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलढाणा, 31 डिसेंबर : व्हॉट्सॲप ग्रुपवर अश्लली मसेज (obscene message in Whatsapp group) केल्याप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. एका महिलेचा नामोउल्लेख करत रात्रीच्या वेळेस शेगाव (Shegaon) पंचायत समितीअंतर्गत कार्यालयीन कामकाजसाठी असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर अश्लील मेसेज पोस्ट केला होता. या प्रकरणी पंचायत समितीचे तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रकाश केवट यांना घटनेच्या 80 दिवसानंतर बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी आदेश काढून निलंबित केले आहे.

रात्रीच्या सुमारास अश्लील मेसेज पोस्ट

शेगाव पंचायत समितीमध्ये गटशिक्षण अधिकारीपदाचा प्रभार पहुरजिरा येथील केंद्रप्रमुख प्रकाश केवट यांच्याकडे होता. यावेळी पंचायत समितीअंतर्गत कार्यालयीन कामकाज असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रकाश केवट यांनी 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी अश्लील मेसेज पोस्ट केला होता.

वाचा : TET परीक्षा घोटाळ्याचं दिल्ली कनेक्शन; दिल्लीतून दोघांना अटक तर तुकाराम सुपेच्या ड्रायव्हरलाही अटक

कार्यालयीन कामकाजाच्या व्हाट्सॲप ग्रुपवर शासकीय कर्मचारी असलेल्या एका महिलेच्या नावासह अश्लील मजकूर असल्याने ग्रुपमध्ये असलेल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापकांना एकच धक्का बसला. प्रभारी गटशिक्षणाधिकारी असलेल्या अधिकाऱ्यानेच मेसेज पोस्ट केल्याने अनेक मुख्याध्यापक, शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली.

...अन् तो मसेजेस तसाच राहिला

तसेच काहींनी केवट यांना माहितीही दिली होती की, आपल्याकडून व्हाट्सअप ग्रुपमध्ये अश्लील मेसेज पोस्ट करण्यात आला आहे तो डिलीट करावा. मात्र डिलिट एव्हरीवन करण्याऐवजी त्यांनी "डिलीट मी" केला त्यामुळे तो मॅसेज तसाच राहिला.

वाचा : 4 मुलांसह विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; धक्कादायक घटनेनं जालना हादरलं

या घटनेनंतर काही शिक्षक महिला आणि शिक्षकांनी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला. यावेळी अश्लील मेसेजमध्ये उल्लेख असलेल्या महिलेने तक्रार केल्यास कारवाई होऊ शकेल असे सांगत त्यावेळी परत पाठवण्यात आले होते. मात्र असे असतानाही तब्बल 80 दिवस उलटल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश काढून शेगाव गटशिक्षण अधिकारी प्रकाश केवट यांना निलंबित केले आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी हा आदेश काढून तब्बल 80 दिवसांनंतर निलंबित केले असून त्यांचे मुख्यालय जळगाव जामोद पंचायत समिती ठेवण्यात आले आहे.

First published:
top videos

    Tags: Buldhana news, Crime, Whatsapp