Home /News /maharashtra /

बुलडाण्यात बलात्कार पीडितेची आत्महत्या, Suicide note आली समोर, धक्कादायक माहिती उघड

बुलडाण्यात बलात्कार पीडितेची आत्महत्या, Suicide note आली समोर, धक्कादायक माहिती उघड

बुलडाण्यात तरुणीची आत्महत्या; Suicide note मधून झाला धक्कादायक खुलासा (प्रातिनिधिक फोटो)

बुलडाण्यात तरुणीची आत्महत्या; Suicide note मधून झाला धक्कादायक खुलासा (प्रातिनिधिक फोटो)

Buldhana girl ends life, shocking information reveals suicide note: बुलडाण्यातील तरुणीने आत्महत्या केल्यानंतर आता तिच्या सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 25 सप्टेंबर : बुलडाण्यात एका तरुणीने आत्महत्या (Buldhana girl suicide) केल्यानंतर कुटुंबाला घरात तिची सुसाईड नोट (Suicide note found) आढळली. या सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या चिठ्ठित जे काही लिहिलं होतं ते वाचून सर्वांनाच मोठा धक्का बसला. आत्महत्येपूर्वी पीडित मुलीने लिहिलेली चिठ्ठी घरातील भग्वदगीतेत ठेवली होती. चिठ्ठी घेऊन तरुणीच्या वडिलांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस (Buldhana Police) ठाण्यात धाव घेतली. वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गावातीलच दोन तरुणांविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे दोन आरोपींपैकी एक आरोपी हा पीडित मुलीचा चुलत भाऊ आहे. काय म्हटलं आहे सुसाईड नोटमध्ये? तरुणीने चिठ्ठीत लिहिले की, "प्रिय पप्पा मला मरण्यासाठी भाग पाडणाऱ्या XXX व XXX ने माझा बलात्कार केला. माझी जिंदगी बरबाद केली. लहानपणापासून त्यांनी माझा बलात्कार केला. माझी तुम्हाला सांगायची एवढी हिंमत नव्हती. मला चारित्र्यावर कलंक लावून घ्यायचा नव्हता. मला माफ करा. माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. XXX व XXX भाऊ म्हणायच्या लायकीचे नाहीत. त्यांनी माझी जिंदगी खराब केली. माझ्या भावानेच माझा घात केला. सगळ्यात जास्त पाप XXX ने केलंय, त्याच्या बायकोचं ही पाप केलंय. हे तुम्हाला माहीत झालं असतं तर महाभारत घडलं असतं. हे सर्व लोकांना माहीत झालं असतं तर लोक तुम्हाले बोलले असते. मी जशी तडपून -तडपून मेले तसे तेही मरतील. माझ्या शांत स्वभावाने माझा घात झाला." डोंबिवलीत 29 जणांकडून 15 वर्षीय मुलीवर 9 महिने गँगरेप एका अल्पवयीन मुलीवर 29 मुलांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी ही 15 वर्षीय आहे. या सामूहिक बलात्कार प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळच्या सुमारास मानपाडा पोलिसांत एक तक्रार दिली. तिने सांगितले की जानेवारी 2021 ते 22 सप्टेंबर 2021 या कालावधीत तिच्यावर डोंबिवली, बदलापूर, रबाळे, मुरबाड या वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या ओळखीतल्या मुलांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानुसार रात्री मानपाडा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुलगी 15 वर्षीय अल्पवयीन असल्याने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी व्हिडीओ बनवत केलं ब्लॅकमेल मिळालेल्या माहितीनुसार, हे कृत्य करताना आरोपींनी व्हिडीओ शूट केलं होतं आणि या व्हिडीओच्या आधारे पीडित मुलीला ते वारंवार ब्लॅकमेल करत होते. त्यानंतर आरोपींनी तिला डोंबिवली, बदलापूर, रबाळे आणि मुरबाड अशा विविध ठिकाणी नेत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी सर्व आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
    First published:

    Tags: Buldhana news, Crime, Suicide

    पुढील बातम्या