buldhana News : खामगावात अग्नितांडव, आठवडी बाजारात 5 ते 6 दुकाने जळून खाक

buldhana News : खामगावात अग्नितांडव, आठवडी बाजारात 5 ते 6 दुकाने जळून खाक

बुलडाणा जिल्ह्यातील खामगावच्या आठवडी बाजारातील फळ फ्रुटच्या दुकानांना भीषण आग लागली.

  • Share this:

बुलडाणा, 10 एप्रिल : बुलडाणा (buldhana) जिल्ह्यातील खामगावच्या (Khamgaon) आठवडी बाजारात भीषण आग लागली आहे. आगीच्या घटनेत 5 ते 6 दुकानं जळून खाक झाली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगावच्या आठवडी बाजारातील फळ फ्रुटच्या दुकानांना भीषण आग लागली. बघता बघता काही क्षणात  आगीने भीषण रूप धारण केले आहे. त्यामुळे काही क्षणात फळाची इतर दुकानं आगीच्या भक्षस्थानी सापडली. आतापर्यंत 5 ते 6 दुकानं जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.  आग लागल्यानंतर आजूबाजूच्या घरांना खाली करणे सुरू असून आगीने भीषण रूप धारण केल आहे. अग्निशमन शमन दलाकडून आग विझवण्याचे शर्यतीचे प्रयत्न सुरू आहे.

सुदैवाने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. त्यामुळे बाजारात गर्दी नव्हती, त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

Published by: sachin Salve
First published: April 10, 2021, 8:19 PM IST

ताज्या बातम्या