Woman suicide in Buldhana by clicking selfie: एका नवविवाहितेने टोकाचं पाऊल उचललं आहे. बुलढाणा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
राहुल खंदारे, प्रतिनिधीबुलढाणा, 22 जानेवारी : राज्यात महिलांवर होणारे अत्याचार काही कमी होताना दिसत नाहीयेत. अद्यापही महिलांना सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळलं (Harassment for dowry) जात असल्याच्या घटना समोर येताना दिसत आहेत. आता बुलढाणा जिल्ह्यातून (Buldhana district) अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील नवविवाहित महिलेने टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं आहे. या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी गळफास घेत असल्याचा एक सेल्फी सुद्धा क्लिक केल्याचं समोर आलं आहे. (Newly married woman ends life by clicking selfie in Buldhana)सेल्फी घेऊन संपवलं आयुष्य
बुलढाणा जिल्ह्यातील कठोरा येथे ही घटना घडली आहे. मेघा वाघ अस आत्महत्या करणाऱ्या विवाहितेच नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे या विवाहितेने आत्महत्येपूर्वी गळ्यात फास अडकवून सेल्फी काढला होता. हा सेल्फी तिने आपल्या नातेवाईकांना पाठवून गळफास घेतला असं बोललं जात आहे. सेल्फी क्लिक करुन आत्महत्या केल्याच्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
वाचा : Mumbai Fire VIDEO: मुंबईतील ताडदेव परिसरात बहुमजली कमला इमारतीला भीषण आगकाय आहे प्रकरण?
20 वर्षीय विवाहितेने घरातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना बुलडाण्यातील कठोरा येथे घडली आहे. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे.
जेवण बनवता येत नाही आणि केलं तर खूपच जास्त करत असते असे सासरच्या मंडळींकडून वारंवार बोलून हिणवलं जात होतं. इतकेच नाही तर हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोपही मृतक महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. प्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिच्या सासरच्या मंडळीविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी जलंब पोलीस अधिक तपास करत आहेत.
बहिणीची बदनामी नाही झाली सहन; भाऊजीला दिली भयंकर शिक्षासोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील तांबोळे याठिकाणी एका तरुणाने आपल्या भाऊजींच्या डोक्यात लोखंडी हातोडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीची बदनामी सहन न झाल्याच्या कारणातून संबंधित तरुणाने हे धक्कादायक कृत्य केलं आहे. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
मनोज बापू चौधरी असं फिर्यादी भाऊजीचं नाव असून ते मोहोळ तालुक्यातील तांबोळे येथील रहिवासी आहेत. तर हनुमंत सदाशिव चव्हाण असं हतोड्याने वार करणाऱ्या मेहुण्याचं नाव आहे. याच्यासोबतच विठ्ठल सदाशिव चव्हाण व सासू मैनाबाई चव्हाण, सासरे सदाशिव चव्हाण या तिघांवर देखील गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.