VIDEO: राज्यात चाललंय तरी काय? आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, दोन दिवसांतील दुसरी घटना

VIDEO: राज्यात चाललंय तरी काय? आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, दोन दिवसांतील दुसरी घटना

Mob attack on police in Buldhana: बुलढाण्यात पोलीस पथकावर जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलढाणा, 15 मे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांवर हल्ला (mob attack on Police) होण्याच्या घटना वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. आता बुलढाण्यात (Buldhana) पोलीस पथकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीच्या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला केला. जमावाने चक्क पोलिसांवर दगडफेक (stone pelting on police) सुद्धा केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी येथील इसमाच्या बकऱ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या असल्याबाबतची तक्रार पोलीस स्टेशन बीबी येथे दाखल केली होती. सदर चोरटे बीबी पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस पथक 13 मे रोजी खापरखेड घुले येथे आरोपींना ताब्यात घेण्यासाठी दाखल झाले. यावेळी पोलीस पथकावर 14 जणांनी हल्ला केल्याची घटना घडली.

हा हल्ला महिला पुरुषांच्या जमावाने केल्यानंतर अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ पाचारण करून ठाणेदार एल डी तावरे यांनी आठ जणांना ताब्यात घेतलं. या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असता त्यांना न्यायालयात हजर करुन दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या हल्ल्यात पोलीस वाहनाच मोठं नुकसान करण्यात आलं होतं तर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.

हिंगोलीतही पोलिसांवर दगडफेक

हिंगोली जिल्ह्यात जमावाने पोलीस स्टेशनवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. जमावाने थेट पोलीस स्टेशनवरच दगडफेक केली आहे. हिंगोलीतील औंढा नागनाथ येथे जमावाने पोलीस स्टेशनवर दगडफेक केली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला आहे. जमावाने केलेल्या या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोबाइल चोरीच्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी मोठा जमाव औंढा पोलीस ठाण्याजवळ जमला. गावातील सय्यद मुजीब यांचा मोबाइल तीन दिवसांपूर्वी चोरीला गेला होता. चोरी करणाऱ्या आरोपींनी सय्यद मुजीब यांना शिवीगाळ केली होती आणि त्यामुळे आज सकाळी मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमत त्यांनी आरोपीला अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर जमावाने हल्ला केला.

Published by: Sunil Desale
First published: May 15, 2021, 7:04 PM IST

ताज्या बातम्या