आंतरजातीय प्रेमसंबंधातून मुलीच्या वडिलांनी तरुणाची जाळून केली हत्या

आंतरजातीय प्रेमसंबंधातून मुलीच्या वडिलांनी तरुणाची जाळून केली हत्या

या प्रकरणी आरोपी सोपान कोल्हेला अटक करण्यात आलीये.

  • Share this:

30 नोव्हेंबर : बुलडाण्यात मुलीच्या आंतरजातीय प्रेमाला विरोध करत मुलीच्या बापानं तरुणाचा जाळून खून केल्याची धक्कादायक उघडकीला आलीये. या प्रकरणी आरोपी सोपान कोल्हेला अटक करण्यात आलीये.

मेंढळी गावातील मुलीचं गावातीलच अमोल झाम्बरे नावाच्या युवकाशी प्रेमसंबध होते. अमोल हा दुसऱ्या जातीचा असल्या कारणाने हे संबंध मुलीच्या वडिलांना मान्य नव्हतं. तरीही दोघे जुमानत नसल्यानं सोपान कोल्हे या मुलीच्या वडिलांने अमोलला त्याच्या मामाच्या शेतात नेऊन जाळून टाकून निर्घृणपणे हत्या केलीय.

दुसऱ्या दिवशी अमोलचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत नातेवाईकांना दिसून आल्यानं पोलिसात घटनेची माहिती दिली. आणि पोलिसांनी आपली तपास चक्रं जोरात फिरवून अमोलला जीवे मारणाऱ्या सोपान कोल्हेला अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलाय. अजूनही या प्रकरणात कुणाचे हात आहे या दृष्टिकोनातून पोलीस तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2017 09:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading