मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बुलडाण्यात बलात्कार पीडितेची आत्महत्या; Suicide note वाचून पोलीसही हादरले

बुलडाण्यात बलात्कार पीडितेची आत्महत्या; Suicide note वाचून पोलीसही हादरले

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

Rape victim commits suicide in buldhana: महाराष्ट्रातील विविध भागांत महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना वाढताना दिसत आहेत. बुलडाणात एका बलात्कार पीडितेने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलडाणा, 24 सप्टेंबर : मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरण ताजे असतानाच राज्यातील विविध भागांत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. बुलडाण्यात (Buldhana) 20 सप्टेंबर रोजी एका तरुणीने आत्महत्या (girl suicide) केली होती. या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पीडित मुलीने लिहिलेली सुसाईड नोट (Suicide note) समोर आली असून ती वाचून पोलीसही हादरले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यात एका 18 वर्षीय युवतीने 20 सप्टेंबरला आत्महत्या केली होती. या युवतीने नेमके कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा खुलासा झाला नव्हता. मात्र काल या युतीच्या आत्महत्येचे कारण उलगडले आहे. घरातील भगवद्गगीतेमध्ये या युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या दोन जणांची नावं तिने लिहून ठेवली होती.

काय म्हटलं होतं चिठ्ठीत?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने चिठ्ठीत आरोपींची नावे लिहिली होती. "XXX आणि XXX यांनी माझ्यावर बलात्कार केला आहे. ही घटना सांगू शकत नसल्याने मी आत्महत्या करत आहे असं सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं.

डोंबिवलीनंतर कल्याण हादरले ! शिक्षकाकडून 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

ही चिठ्ठी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोन जणांपैकी एक या युवतीचा चुलत भाऊ असल्याचं या युवतीने त्या चिठ्ठी लिहून ठेवलं आहे. ही चिठ्ठी मिळताच या युवतीच्या वडिलांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला धाव घेतली आहे. बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ दखल घेत चिट्ठी हस्तगत करून तक्रार दाखल करून घेतली आहे. पुढील चौकशीनंतरच पोलीस विभागाकडून ठोस कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

डोंबिवलीत 29 जणांकडून 15 वर्षीय मुलीवर 9 महिने गँगरेप

एका अल्पवयीन मुलीवर 29 मुलांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी ही 15 वर्षीय आहे. या सामूहिक बलात्कार प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळच्या सुमारास मानपाडा पोलिसांत एक तक्रार दिली. तिने सांगितले की जानेवारी 2021 ते 22 सप्टेंबर 2021 या कालावधीत तिच्यावर डोंबिवली, बदलापूर, रबाळे, मुरबाड या वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या ओळखीतल्या मुलांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानुसार रात्री मानपाडा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुलगी 15 वर्षीय अल्पवयीन असल्याने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

23 आरोपी ताब्यात, दोन अल्पवयीन

या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 23 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे त्यापैकी दोन अल्पवयीन मुलं आहेत. या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आलं आहे. महिला सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या अंतर्गत प्रकरणाचा तपास करत आहेत.

आरोपींनी व्हिडीओ बनवत केलं ब्लॅकमेल

मिळालेल्या माहितीनुसार, हे कृत्य करताना आरोपींनी व्हिडीओ शूट केलं होतं आणि या व्हिडीओच्या आधारे पीडित मुलीला ते वारंवार ब्लॅकमेल करत होते. त्यानंतर आरोपींनी तिला डोंबिवली, बदलापूर, रबाळे आणि मुरबाड अशा विविध ठिकाणी नेत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी सर्व आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

First published:

Tags: Buldhana news, Crime, Suicide