मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Buldhana Crime : बुलढाण्यात तीन जणांवर चाकू हल्ला, आरोपींना सिनेस्टाईल पकडले

Buldhana Crime : बुलढाण्यात तीन जणांवर चाकू हल्ला, आरोपींना सिनेस्टाईल पकडले

बुलढाणा शहरात पैशाच्या वादातून तीन जणांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. यात तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहे.

बुलढाणा शहरात पैशाच्या वादातून तीन जणांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. यात तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहे.

बुलढाणा शहरात पैशाच्या वादातून तीन जणांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. यात तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहे.

  • Published by:  Sandeep Shirguppe

बुलढाणा, 21 ऑगस्ट : बुलढाणा शहरात पैशाच्या वादातून तीन जणांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. यात तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहे. (Buldhana Crime) एकावर बुलढाणा शहरात खाजगी रुग्णालयात तर दोन जणांना पोटात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. पैशाच्या वादातून झालेल्या हल्ल्यानंतर या मारहाणीत हा चाकू हल्ला करण्यात आला आहे. यातील तीनही आरोपी पळून जात असताना बुलढाणा शहर पोलिसांनी विविध पथकाच्या मार्फत सिनेस्टाईल पद्धतीने मध्यरात्री या तीनही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि. 20) रात्री 9च्या सुमारास बुलढाणा येथील गजानन टॉकीजजवळ विशाल पान सेंटरच्या शेजारी किराणा दुकान आहे. दुकानमालक अग्रवाल आणि समाधान मोरे याचे नातेवाईक बबन यांच्यात पैशाच्या व्यवहारातून वादविवाद झाले. यात अग्रवाल यांच्याकडून संतोष पाटील (रा. जुनागाव) हे मध्ये पडले. परंतु समाधान मोरे, त्याचा भाचा रितेश आणि इतर दोन-तिन जणांनी संतोष पाटील यांना मारहाण केली. हे कळल्यानंतर पाटील यांचा तरुण मुलगा तुषार आपला मित्र सनी पवार याला घेऊन महावीर किराणावर पोहोचले. त्याठिकाणी दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली.

हे ही वाचा : Wardha Farmer Suicide : केंद्रीय पथक, फडणवीस, सगळे आले पण मदत नसल्याने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

सनी पवार (कैकाडीपुरा) याचे वडील संजू पवार तिथेच होते. ते सुद्धा आपल्या मुलाला वाचविण्यासाठी मध्ये पडले. दरम्यान, समाधान मोरे व त्याचा भाचा रितेश यांच्यापैकी कुणाकडे चाकू होता, की दोघांकडे होता याची निश्चित माहिती नाही. परंतु त्यांच्या चाकू हल्ल्यात संतोष संतोष पाटील, सनी संजू पवार आणि सनीचे वडील संजू तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. तुषार याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. त्याचे लिव्हरला इजा पोहोचली असल्याची माहिती आहे. तर संजू पवार यांच्या किडनीपर्यंत चाकू आत गेला असून तो देखील गंभीर जखमी झाला आहे. सनीवर देखील जीवघेणा हल्ला झाल्याने त्याची देखील मांडी फाटली.

तिघांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. सनीच्या मांडीवर वार असल्यामुळे त्याला येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर तुषारच्या पोटातून भयंकर रक्तस्त्राव होत होता आणि संजू पवार यांच्या पोटातही चाकू लागल्यामुळे या दोघांना तातडीने औरंगाबादला हलविण्यात आले आहे.

हे ही वाचा : 'त्यांनी 1 मारला, आपण 5 मारले आणि अजूनही..'; मॉब लिंचिंगवर भाजपच्या माजी MLA चं खळबळजनक विधान, Video

घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड, त्यांचे पुत्र मृत्युंजय यांनी हॉस्पिटल गाठून जखमींची भेट घेतली. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातील अॅंम्ब्युलन्समधून गंभीर जखमीना औरंगाबादला नेण्यात आले. दवाखान्यात शेकडो लोक जमा झाले होते. हल्ल्यानंतर समाधान मोरे आणि त्याचे साथीदार फरार झाले आहेत. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. तर शहरात दहशतीचे वातावरण आहे.

First published:

Tags: Buldhana news, Crime, Crime news, Police