मातेला सलाम! रस्त्याच्या कडेला सोडून दिलेल्या बालकाचे स्वीकारले पालकत्व

मातेला सलाम! रस्त्याच्या कडेला सोडून दिलेल्या बालकाचे स्वीकारले पालकत्व

एकीकडे समाजातील माणुसकी मरत चालली असताना एका मातेनं आपल्या पोटच्या नसल्या तरी रस्त्याच्या कडेला सापडलेल्या बालकाला मातृत्व दिले.

  • Share this:

अमोल गावंडे,बुलडाणा

बुलडाणा, 03 नोव्हेंबर : एकीकडे समाजातील माणुसकी मरत चालली असताना एका मातेनं आपल्या पोटच्या नसल्या तरी रस्त्याच्या कडेला सापडलेल्या बालकाला मातृत्व दिले. बुलडाण्यातील खामगाव येथील या घटनेनं सर्वांचेच मन जिंकले. जन्मदात्रीने भर थंडीत आपल्या एक वर्षाच्या बालकाला सोडून दिले होते. या बालकाच्या रडण्याच्या आवाजाने संपूर्ण गाव शहारले. या बालकाच्या मतिमंद आईने निष्ठुरता दाखवून बाळाला सोडले असले, तरी जागरूक नागरिकांनी मिळून दिलेली मायेची ऊब या बाळासाठी जीवनदायी ठरली. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील ठाकरे दाम्पत्याने या बाळाला कायदेशीररित्या दत्तक घेऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील ढालसावंगी या गावात एक वर्षाच्या बालकाला रस्त्याच्या कडेला सोडून देण्यात आले होते. मात्र गावकऱ्यांनी समाजभान राखत या बालकाला सामाजिक संस्थेकडे सोपवले. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे पोहचून थंडी आणि भुकेने रडणाऱ्या या बालकाला ताब्यात घेऊन रुग्णालयात नेले. यात दरम्यान समाजभान टीमचे दादासाहब थेटे आणि खिदमते मिल्लत संस्थेचे इरफान खान पठाण यांनी मानवतेचे दर्शन घडवत त्या निराधार, निरागस मुलाला नवे आई, वडील मिळवून दिले. खामगाव येथील ठाकरे दांपत्यानेही अत्यंत मायेने लेकराला जवळ घेत त्याचा स्वतःच्या मुलाप्रमाणे या बाळाला मायेची उब दिली. मुख्य म्हणजे समाजमन संस्था ही डॉ प्रकाश आमटे यांच्या आंनदवन येथील लोकबिरादरी परिवाराशी जुडलेली आहे. तसेच, ठाकरे दाम्पत्यही लोकबिरादरी परिवाराशी जोडलेले असल्यामुळं या योगायोग जुळून आला.

वाचा-'...तर कृषीमंत्रिपद स्वीकारणार', राजू शेट्टींनी दाखवली तयारी

वाचा-पंकजा मुंडेंच्या फेसबुक पोस्टवरून पुन्हा नव्या चर्चा

ठाकरे दाम्पत्याच्या एकुलत्या एका मुलाचा 28 मे 2014 रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर जवळ जालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर ठाकरे दाम्पत्याला मुलं होणे कठीण असल्याने ठाकरे कुटुंब दाम्पत्य नेहमी चिंतेत आणि दुःखात होते. यांनतर त्यांचा सहवास बाबा आमटे यांच्या लोकबिरादरीचे आनंद वन सेवा प्रकल्पाशी आला.

वाचा-देवेंद्र फडणवीसांनी केला पंकजा मुंडे यांना फोन, म्हणाले...

हल्ली समाजात अशी फार कमी लोक पाहायला मिळतात, जी आपल्या मायेनं आपल्या पोटचा नसला तरी त्या बालकावर प्रेम करतील. मात्र ठाकरे दाम्पत्यांनी दाखवलेल्या या मायेमुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2019 04:43 PM IST

ताज्या बातम्या