Home /News /maharashtra /

अन् काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी फिरता पंखा एका बुक्कीतच रोखला, हिरोगिरीचा VIDEO VIRAL

अन् काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी फिरता पंखा एका बुक्कीतच रोखला, हिरोगिरीचा VIDEO VIRAL

Congress District President Rahul Bondre Video goes viral: काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

    राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 1 सप्टेंबर : बुलडाण्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि चिखली मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे (Congress District President Rahul Bondre) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल (Video viral in Social Media) होत आहे. हा व्हिडीओ काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमातील असून त्या कार्यक्रमात राहुल बोंद्रे यांनी असा काही पराक्रम केला आहे की, त्याने सर्वांनाच अचंबित केलं. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे की, बुलडाणा जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच चिखली मतदार संघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे हे चक्क हाताने चालत्या फॅनला बुक्की मारून थांबवत आहेत. राहुल बोंद्रे हे एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी स्टेजवर उभे राहिले. त्यावेळी डोक्यावर असलेला फॅन लागेल म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांना सावध केलं..मात्र या कार्यकर्त्यांसमोरच हिरोगीरी करत राहुल बोंद्रे यांना सतर्क केले. 'UP निवडणुकांआधी होणार बड्या हिंदू नेत्याची हत्या'; राकेश टिकेत यांचं वादग्रस्त विधान यावेळी राहुल बोंद्रे यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली हिरोगिरी दाखवल्याचं पहायला मिळालं. या कार्यकर्त्यांसमोरच हिरोगिरी करत राहुल बोंद्रे यांनी चक्क चालत्या फंख्याला बुक्की मारून थांबवलं. यावेळी उपस्थितांनी या कर्तबगारी बाबत टाळ्या वाजवून राहुल बोंद्रे यांचे मनोबल वाढवले खरे.. पण अशी हिरोगिरी करत असताना त्यांच्या हाताला दुखापत देखील होऊ शकली असती. त्यामुळे असे धाडस करणे चुकीचे आहे. तसेच तुम्ही अशा प्रकारे कृत्य चुकूनही करण्याचं धाडस करु नका.
    First published:

    पुढील बातम्या