मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या गाडीला भीषण अपघात, 3 जण गंभीर

शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या गाडीला भीषण अपघात, 3 जण गंभीर

अपघातात आमदार रायमूलकर यांच्यासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

अपघातात आमदार रायमूलकर यांच्यासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

अपघातात आमदार रायमूलकर यांच्यासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

अमोल गावंडे, बुलडाणा, 11 जानेवारी : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभेचे शिवसेना आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आमदार रायमूलकर यांच्यासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शिवसेनेचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या 407 या वाहनाने धडक दिल्याने दोन्ही वाहने पलटी झाली. यामध्ये आमदार रायमुलकर यांच्यासह त्यांचे अंगरक्षक आणि वाहन चालक हे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ औरंगाबाद येथील रुग्णालयात रेफर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

आमदार रायमुलकर हे आपल्या इको स्पोर्ट या गाडीने खामगाववरून कार्यक्रम संपवून मेहकर येथे परत जात असताना मेहकरकडून येणाऱ्या 407 या वाहनाने नायगाव दत्तपुर नजीक समोरासमोर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की आमदार रायमुलकर यांची गाडी जागीच पलटी झाली. तसंच धडक दिलेलं 407 वाहनही पलटलं.

आमदार रायमुलकर यांच्यासह दोघांना मेहकर येथे प्राथमिक उपचार करत औरंगाबाद येथील महात्मा गांधी मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ रेफर करण्यात आले आहे. तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताचं प्रमाण लक्षणीय वाढलं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-गोवा, पुणे-बंगळुरू या महामार्गांवर सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. आता तर लोकप्रतिनिधींच्या गाडीला होणाऱ्या अपघातांच्या घटनाही वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे अनेक महामार्ग मृत्यूचे सापळे ठरत असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे.

First published:
top videos