Home /News /maharashtra /

ट्रक आणि बसचा भीषण अपघात, 26 प्रवासी जखमी

ट्रक आणि बसचा भीषण अपघात, 26 प्रवासी जखमी

अपघातग्रस्त बसमध्ये 55 ते 60 प्रवासी असल्याची माहिती आहे.

    अमोल गावंडे, बुलडाणा, 14 जानेवारी : खामगाव-अकोला रोडवर बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील 26 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बुलडाण्यातील टेंभुर्णा फाट्यावर हा अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने बसला समोरून धडक दिली. या धडकेत बसच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला. या अपघातग्रस्त बसमध्ये 55 ते 60 प्रवासी असल्याची माहिती आहे. यातील 26 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुलडाण्यात बस अपघातांची मालिका, महिनाभरात तीन घटना बुलडाण्यात गेल्या काही दिवसांपासून बस अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या महिनभरात झालेला हा तिसरा बस अपघात आहे. 4 जानेवारीला भरधाव एसटी बसचा स्टेअरिंग रॉड तुटून झालेल्या अपघातात 23 विद्यार्थी जखमी झाले होते. बीडमध्ये चाइल्ड पॉर्नोग्राफीचा प्रकार उघड झाल्याने खळबळ, दोन अश्लील VIDEO झाले अपलोड खामगाव तालुक्यातील कोथळी गावाजवळ शनिवारी सकाळी ही घटना घडली. मलकापूर आगाराची ही बस चिचखेडनाथ येथून मोताळा येथे जात होती. धावत्या एसटी बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस रस्त्या खाली उतरून थेट शेतीच्या बांधला जाऊन धडकली. बस शेतीच्या बांधला धडकल्याने मोठा अनर्थ टळला होता. दुसरीकडे, 03 डिसेंबर रोडी साखरपुड्यासाठी गावी निघालेल्या दिव्यांग शिक्षकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुलडाण्यात घडली होती. बुलडाण्यावरून खामगावकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने दिव्यांग शिक्षकाचा दुचाकीला धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Buldana

    पुढील बातम्या