मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...म्हणून अंडी-मटण खाण्याचा सल्ला दिला, सेनेचे आमदार संजय गायकवाडांचा खुलासा

...म्हणून अंडी-मटण खाण्याचा सल्ला दिला, सेनेचे आमदार संजय गायकवाडांचा खुलासा

Sanjay Gaikwad statement contro शाळांमध्ये मध्यान्ह भोजनात अंडी देतात. अनेक वसतीगृहांमध्ये मुलांना मांसाहार दिला जातो. भारतीय लष्करालाही नॉनव्हेज दिलं जातं. त्यामुळं याचं सेवन केल्यासं कोरोनाचं प्रमाण कमी होतो, असं गायकवाड म्हणाले.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

बुलडाणा, 13 मे : शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार (Shivsena MLA) संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) हे एका वक्तव्यावरून सध्या चर्चेत आहेत. कोरोनाच्या काळात (Coronavirus) उपास करण्याची वेळ नाही, अंडी मटन खा (Eat eggs, mutton) असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आल्या तसंच विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. मात्र अंडी, मटण खाल्ल्याने प्रोटिन मिळते त्यामुळे हा सल्ला दिला होता. त्यामुळं वक्तव्यावर ठाम असल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.

(वाचा-कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे असावं, NTAGI चा सल्ला)

संजय गायकवाड यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलताना अंडी, मटण खाण्याबाबत वक्तव्य केलं होतं. पण त्यावर वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 'प्रतिकारशक्ती वाढवण्याकरिता प्रोटीन म्हणजे किमान रोज अंडी खावी किंवा एक दिवस चिकन मटण खावं असं मी म्हटलं होतं. पण काही जणांनी विनाकारण याचा मुद्दा बनवून टीका सुरू केली. शाळांमध्ये मध्यान्ह भोजनात अंडी देतात. अनेक वसतिगृहांमध्ये मुलांना मांसाहार दिला जातो. भारतीय लष्करालाही नॉनव्हेज दिलं जातं. त्यामुळं याचं सेवन केल्यासं कोरोनाचं प्रमाण कमी होतो, असं बोलल्याचं ते म्हणाले.

(वाचा-रुग्णांसाठी पोलिसांनी हाती घेतला स्टेथेस्कोप; निभावतायेत डॉक्टरचीही जबाबदारी)

मांसाहार केल्यान धर्मभ्रष्ट होत असेल तर समाजातील मांसाहार करणाऱ्या सर्वांना तुम्ही धर्मातून बाहेर काढणार का, असा सवालही त्यांनी टीका करणाऱ्यांसमोर उपस्थित केला. एखा विश्ष्ट पक्षाने ध चा मा करून या वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न त्यांच्या सेलच्या माध्यमातून सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कुठलाही संप्रदाय किंवा धर्मावर मी विधान केलं नाही. कोणाच्याही विरोधात विधान केलं नाही, त्यामुळं विधानावर ठाम असल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने या प्रकरणावरून संजय गायकवाड यांना निलंबित करण्याची मागणी  विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांकडे केली आहे. शिवसेना यावर मूग गिळून गप्प असल्याची टीकाही भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी केली आहे. संजय गायकवाड बौद्धिक दिवाळखोर असल्याने संवैधानिक पदावर राहण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यामुळं त्यांना तत्काळ निलंबित करावं अन्यथा सर्व वारकरी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला.

कोरोनाच्या या संकटकाळामध्ये आधीच पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. त्यात आता आणखी एक नवा मुद्दा समोर आल्यानं भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने उभे राहण्याची दाट शक्यता आहे.

First published:

Tags: Coronavirus, Shivsena