राहुल खंदारे,प्रतिनिधी
बुलडाणा, 18 एप्रिल : शिवसेनेचे (Shivsena) आमदार संजय गायकवाड यांनी भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Shiv sena MLA Sanjay Gaikwad abusing Devendra Fadnavis)यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वाद पेटला आहे. बुलडाण्यात निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.
बुलडाण्यातील जयस्तंभ चौकात आज दुपारी 4 वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. संजय गायकवाड यांचा निषेध करण्यासाठी पोहोचलेल्या भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. शिवसेना नेते विजयराज शिंदे यांच्या सहित तीन ते चार भाजप कार्यकर्त्यांवर शिवसैनिकानी हल्ला चढवला.
500 कोटींची फसवणूक; कल्पतरु ग्रुपच्या फरार मालकाचा कोरोनामुळे मृत्यू
शिवसैनिकांचा आरोप आहे की, भाजपावाले आमदार गायकवाड यांचा पुतळा जाळण्यासाठी आले होते. तेव्हा धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष तथा आमदारपुत्र कुणाल गायकवाड यांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही गटात पकडापकडी झाली. शिंदे यांना खाली पाडून त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजप करीत आहे.
पोलिसांच्या मध्यस्थीमुळे दोन्ही गटाना वेगळे करण्यात आले. भाजप नेते योगेंद्र गोडे तथा विजयाताई राठी, प्रभाकर बारे, सोनू बाहेकर, करण बेंडवाल तसंच अनेक भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीत भीषण आग, तिघांचा मृत्यू
तर शिवसैनिकांमध्ये श्रीकांत गायकवाड, बाळासाहेब धुड, बंडू आसाबे, संदीप पुराणिक तसंच अनेक जण सहभागी होते. शिवसैनिकांच्या आक्रमकतेपुढे भाजपाला पळती भुई थोड़ी झाली, असा दावा शिवसेनेने केला आहे तर शिवसेनेची दादागिरी या घटनेतून समोर आली आहे, असे भाजपचं म्हणणं आहे. सध्या भाजप नेते आणि कार्यकर्ते शहर पोलीस स्टेशनसमोर गोळा झालेले आहेत.
आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोना विषाणु कोंबायचे विधान केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी भाजपने गायकवाड यांचा पुतळा जाळण्याचे ठरविले होते. परंतु शिवसैनिकांनी भाजपचा प्लॅन फेल केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.