मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'कामावर जा आणि पैसे कमव', 75 वर्षांच्या आईला मुलांनी काढले घराबाहेर

'कामावर जा आणि पैसे कमव', 75 वर्षांच्या आईला मुलांनी काढले घराबाहेर

75 वर्षीय जन्मदात्या आईलाच चक्क पोटच्या मुलांनी घरातून हाकलून दिलं आहे.

75 वर्षीय जन्मदात्या आईलाच चक्क पोटच्या मुलांनी घरातून हाकलून दिलं आहे.

75 वर्षीय जन्मदात्या आईलाच चक्क पोटच्या मुलांनी घरातून हाकलून दिलं आहे.

  • Published by:  Akshay Shitole

अमोल गावंडे, बुलडाणा, 31 जानेवारी : पैसे कमवून आणत नाही म्हणून वृद्ध आईला पोटच्या मुलांनीच घरातून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यामध्ये घडला आहे. 'शेतात कामाला जा आणि कमवून आण,' असा तगादा लावत कामावर जात नाही म्हणून एका 75 वर्षीय जन्मदात्या आईलाच चक्क पोटच्या मुलांनी घरातून हाकलून दिलं आहे.

मुलांनी घरातून हाकलून दिल्यावर वृद्ध आई खामगावच्या सामान्य रुग्णालयाचा सहारा घेत कसेबसे जीवन जगत आहे. या हृदयद्रावक घटनामुळे परिसरातील नागरिकांचे मन हेलावले असून वृद्ध आईने पोलिसांत तक्रार दिल्यावर आता पोलिसांनी त्या वृद्ध आईला सुखरूप घरी पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

द्वारकाबाई महादेव पल्हाडे , वय 75 वर्ष ही वृद्ध महिला आपल्या 2 मुले, सून आणि नातवंडांसह पळशी बु. येथे राहत होती. मात्र काही दिवसांपूर्वी  द्वारकाबाई पल्हाडे यांना त्यांचा मुलगा सहदेव आणि  वासुदेव पल्हाडे यांनी घरातून हाकलून दिलं. तर सुनांनी शिवीगाळ करत मारहाणही केली, असा असा द्वारकाबाई यांचा आरोप आहे. ही घटना घडल्यावर या वृद्ध महिलेने खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठीत त्यांच्या दोन मुलांच्या नावे तक्रार दाखल केली आहे.

लहान भावाने 'ऑन द स्पॉट' घेतला बदला, बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाची केली हत्या

तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांना विचारले तर धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'मला दोन मूले असून त्यांची नावे सहदेव आणि वासुदेव आहेत. तू कामावर जा आणि कमवून आणून दे , असा तगादा या  मुलांनी लावला. मात्र आपले वय झाल्याने आपल्याने काम होत नाही, असे सांगितल्यावरून मुलांनी आपल्याला घरातून हाकलून दिलं आहे. तसंच शिवीगाळ आणि मारहाणही केली आहे,' असं वृद्ध महिलेनं पोलिसांना सांगितलं आहे.

दरम्यान, या वृद्ध महिलेकडे जवळपास 12 एकर शेती असून मुले शेती करतात. मात्र या वृद्ध आईला या वयात मुलांकडून जी अपेक्षा आहे ती पूर्ण होऊ शकत नाही. अशा पद्धतीने जन्मदात्या आईलाच काम होत नाही आणि कमवून आणत नाही म्हणून घराबाहेर काढल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

First published:

Tags: Buldana