बुलढाणा, 17 जुलै: बुलढाण्यातील (Buldana) एका डॉक्टरनं वेगळीच कमाल केली आहे. या डॉक्टरचं कौतुक अख्ख्या बुलढाण्यात केलं जात आहे. या डॉक्टरानं एका चिमुरड्याच्या घशातून सेल (Battery Cell) काढला आहे. तेही एनेस्थेसिया शिवाय (Anesthesia)या डॉक्टरनं हे ऑपरेशन केलं आहे.
एका मुलानं सेल गिळला होता. त्यानंतर त्याची प्रकृती खालावली जात होता. त्याची कुटुंबियांनी त्याला तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे नेलं. स्थानिक डॉक्टरांनी मुलाला तात्काळ अकोलातील सिटी रुग्णालयात दाखल करा. तोवर मुलाला श्वास घेताना त्रास सुरु झाला होता.
साडे तीन वर्षांच्या मुलाला होणारा वाढता त्रास पाहून त्याच्या पालकांनी लगेचच प्रकाश चिल्ड्रन रुग्णालयात दाखल केलं. तिथे दाखल केल्यानंतर डॉक्टर सचिन सांगळे यांनी मुलाच्या गळ्याचे एक्स रे रिपोर्ट काढले. ज्यात अन्ननलिकेत (pharyngitis)मध्ये सेल असल्याचं दिसलं. त्यानंतर डॉक्टरांनी सल्ला दिला की, अकोल्याला जाऊन एंडोस्कोपी करा. मात्र मुलाच्या पालकांनी डॉक्टरांना विनंती केली की, कृपया येथेच काहीतरी उपचार करा. त्यानंतर डॉक्टरांनी मुलाच्या घशातील सेल काढण्यासाठी एक उपाय केला. जो आजपर्यंत कोणीच केला नसेल.
जबरदस्त! ठाणेकराचं दुबईत चमकलं नशीब, झाला कोट्यधीश
असा काढला मुलाच्या घशातील सेल
डॉक्टरनं फोलिज कॅथेटर (Foliage Catheter) चे टोक मुलाच्या तोंडात टाकलं. काही वेळ कॅथेटर तोंडाच्या आत ढकलल्यानंतर, दुसर्या टोकाला सलाईन लावण्यात आलं. कॅथेटर पुढच्या भागात एक छोटा फुगा (Ballon) तयार झाला. फुगा तयार झाल्यानंतर कॅथेटर हळू हळू बाहेर काढला गेला.
जेव्हा कॅथेटर बाहेर काढण्यात आलं. तेव्हा मुलाचे आई- वडिलांसह डॉक्टर देखील हैराण झाले. त्या फुग्यासोबत सेल देखील बाहेर आला होता. सेलच्या एका बाजूचा लाल रंग निघाला होता. यावर डॉक्टर म्हणाले की, सेलमध्ये लिथियम असते. ते घशात वितळण्यास सुरु झालं होतं. जर सेल आणखी वेळ गळ्यात राहिला असता तर मुलासाठी जीवघेणं ठरु शकलं असतं.
कर्नाटकातल्या राजकारणात फेरबदलाचे वारे, CM येडियुरप्पा घेणार मोठा निर्णय
अशा गोष्टी हाताळण्याचा हा अनोखा मार्ग आहे. एनेस्थेसिया शिवाय मुलाच्या घशातून सेल काढण्यात आला. हे आश्चर्यचकित करणारे आहे. संपूर्ण जिल्ह्यात या ऑपरेशनची चर्चा होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Buldhana news