आई ती आईच असते! मादी अस्वलाचा पिलासाठी हंबरडा; अभयारण्यातील VIDEO समोर

आई ती आईच असते! मादी अस्वलाचा पिलासाठी हंबरडा; अभयारण्यातील VIDEO समोर

आपलं पिल्लू दूर गेल्याने त्याला शोधण्यासाठी मादी अस्वल बुलडाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात हंबरडा फोडून शोधत आहे. हा व्हिडीओ कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

  • Share this:

राहुल खंडारे, बुलडाणा, 13 एप्रिल : जगात आई आणि मुलाचं नातं हे सर्वात पवित्र मानलं जातं. मानव असो की प्राणी आई ही आईच असते. आपलं पिल्लू दूर गेल्याने त्याला शोधण्यासाठी मादी अस्वल बुलडाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात हंबरडा फोडून शोधत आहे. हा व्हिडीओ कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

प्राण्यांच्या बाबतीत बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हे अस्वलाच माहेर घर म्हणून ओळखलं जातं.आज सकाळी नेहमी प्रमाणे वन विभागाचे कर्मचारी पेट्रोलिंगसाठी गेले होते. तेव्हा जंगलात एक अस्वल वेगळ्याच आवाजात ओरडण्याचा आवाज आला. या कर्मचाऱ्यांच लक्ष त्या दिशेकडे गेलं, तेव्हा त्यांना एक अस्वल इकडे तिकडे काही तरी शोधत असल्याचं लक्षात आलं.

तेवढ्यात दुसऱ्या बाजूने अस्वलाचं एक पिल्लू धावत, पडत त्या मादी अस्वलाकडे निघाल आणि जेव्हा ते अस्वलाच पिल्लू आपल्या आई जवळ गेल तेव्हाची दृश्य ही शब्दात व्यक्त होणारी नाही, ती फक्त डोळ्यात साठवून ठेवणारी दृश्य होती, असं वर्णन वनाधिकाऱ्यांनी केलं आहे.

अस्वल हा काहीसा आक्रमक असा प्राणी आहे. असा प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवणं वन कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनेही दुर्मिळच बाब होती. मानव असो की, प्राणी आई ही आईच असते अस मत वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे यांनी व्यक्त केलं आहे.

ज्ञानगंगा अभयारण्य जवळपास 20 हजार हेक्टरवर पसरलं आहे. या जंगलात प्रामुख्याने अस्वल, बिबटे, तरस, रानडुक्कर प्राणी आढळतात. जंगलात नेहमीच वनाधिकाऱ्यांची गस्त असते. त्याचवेळी एक मादी अस्वल आपल्या पिल्लाच्या शोधात असलेलं दृश्य पाहायला मिळालं.

Published by: Karishma Bhurke
First published: April 13, 2021, 10:11 AM IST
Tags:

ताज्या बातम्या