मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पंचायत समितीसमोर बसलेला उपोषणकर्ता अचानक गायब! बुलडाणा जिल्ह्यात खळबळ

पंचायत समितीसमोर बसलेला उपोषणकर्ता अचानक गायब! बुलडाणा जिल्ह्यात खळबळ

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर एक उपोषणकर्ता गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर एक उपोषणकर्ता गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर एक उपोषणकर्ता गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.

  • Published by:  Rahul Punde
बुलडाणा, 16 ऑगस्ट : बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. तालुक्यातील वरवट खंडेराव येथील एक नागरीक संग्रामपूर पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसला होता. स्वातंत्र्यदिनाच्या एकदिवस आधीपासून हे आंदोलन सुरू झालं होतं. मात्र, आज अचानक ही व्यक्ती गायब झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. उपोषण करणाऱ्या व्यक्तीच्या मुलांनी यासंबंधी संग्रामपूर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. काय आहे प्रकरण? स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस अगोदर 14 ऑगस्टपासून विविध मागण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील वरवट खंडेराव येथील संतोष गाळकर यांनी संग्रामपूर पंचायत समिती कार्यालयासमोर चारचाकी वाहनात उपोषण सुरू केले होते. स्वातंत्र्यदिनी देखील त्यांचे आंदोलन सुरूच होते. आज 16 ऑगस्ट रोजी या वाहनात बसलेला उपोषणकर्ता अचानक उपोषण स्थळावरून गायब झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही माहिती समजताच पंचायत समितीसमोर नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. उपोषणकर्ता गायब झाल्याने चर्चांना उधाण संतोष गाळकर यांनी चारचाकी वाहनात उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या गाडीत कपडे, चप्पल आणि कागदपत्रे जागेवरच आढळून आली असल्याने याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. स्वातंत्र्यादिनी सर्व अधिकारी पंचायत समितीमध्ये आले असताना नेहमीप्रमाणे उपोषण कर्त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे पंचायत समिती प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. सगळीकडे नातेवाईक शोधा शोध घेत असुनही अद्यापपर्यंत तामगाव पोलिसांना याबत कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. या संदर्भात संतोष गाळकर यांच्या मुलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे आता पोलीस देखील संतोष गाळकर यांचा शोध घेत आहे. हीच ती कार! विनायक मेटेंचा 3 ऑगस्टला पाठलाग करणाऱ्या गाडीचा फोटो आला समोर घातपात की आणखी काही? गेल्या दोन दिवसांपासून उपोषण करत असलेले संतोष गाळकर अचानाक गायब झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांचा काहीही तपास लागत नसल्याने काही घातपास तर झाला नाही ना? अशीही शंका व्यक्त करण्यात येत आहे. संतोष गाळकर गायब झाल्याने लोक प्रशासनावर चिडले असून वेळीच दखल का घेतली नाही? म्हणून जाब विचारला आहे.
First published:

Tags: Buldhana news

पुढील बातम्या