मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Buldana Crime : बुलढाण्यात मुलानेच अपहरणाची रचली खोटी कहाणी, पोलिसांकडून पोलखोल

Buldana Crime : बुलढाण्यात मुलानेच अपहरणाची रचली खोटी कहाणी, पोलिसांकडून पोलखोल

दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथून शिवाजी हायस्कूलमधील दहावीतल्या एका मुलाला दोन अपहरणकर्त्यांनी अपहरण गेल्याची माहिती पसरली होती. (Buldhana Crime)

  • Published by:  Sandeep Shirguppe

बुलढाणा, 23 सप्टेंबर : दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथून शिवाजी हायस्कूलमधील दहावीतल्या एका मुलाला दोन अपहरणकर्त्यांनी अपहरण गेल्याची माहिती पसरली होती. (Buldana Crime) त्यानंतर या मुलाने स्वतःची सुटका करून घेतली अशा आशयाचा एक व्हिडिओ बुलढाणा जिल्ह्यातील सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात लहान मुलांना किडण्याप करणारी टोळी सक्रिय असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली होती.

मात्र मुलाने सांगितल्याप्रमाणे संपूर्ण मार्गावर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता तसा कुठलाच प्रकार आढळून आला नाही. शिवाय ज्या ठिकाणाहून मुलाचं किडनॅपिंग केल्याच मुलगा सांगत होता त्या ठिकाणचा परिसर हा वर्दळीचा असल्याने या संपूर्ण घटनेबाबत पोलीस साशंक असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. सोबतच या मुलाच्या हाताला लागल्यानंतर त्यांनी स्थानिक रुग्णालयात जाऊन वर्गात बेंच लागला असल्याच सांगत उपचार सुद्धा केल्याची माहिती स्थानिक नर्स कडून पोलिसांना देण्यात आली.

हे ही वाचा : टँकरमधील गॅस गळतीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर अजूनही बंद; कधी सुरळित होणार वाहतूक?

त्यामुळे हाताला लागल्यानंतर वडील ओरडतील, मारतील या भीतीपोटीच या मुलाने स्वतःच्या अपहरणाची खोटी कहाणी रचली असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या अशा पोस्ट्सबाबत खात्री केल्याशिवाय त्या पसरवू नये अशी आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलय.

या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमधील सुसंवाद संपत चाललाय की काय ? असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जाऊ लागलाय. अशा प्रकारे मुलांकडून स्वतःच्या अपहरणाची खोटी कहाणी रचून पोलीस यंत्रणा तसेच सर्वसामान्यांना वेठीस धरल्या जात असेल तर यासाठी पालकही तितकेच जबाबदार आहेत असेच म्हणावे लागेल.

हे ही वाचा : फिल्मी स्टाईल राडा! भरधाव कारने हवेत उडवलं तरी तरुण करत राहिले फायटिंग; Watch Video

अशा प्रकारात एखादी मोठी अनुचित घटना घडू शकते, त्यामुळे पालकांनो आपल्या मुलांशी हितगुज साधा, सुसंवाद साधा असं म्हणायची वेळ आली आहे.

First published:

Tags: Buldhana news, Crime, Crime news

पुढील बातम्या