पाठलाग करणाऱ्या पोलिसाला अंगावर टिप्पर घालून चिरडलं, महाराष्ट्राला हादरवणारं हत्याकांड

पाठलाग करणाऱ्या पोलिसाला अंगावर टिप्पर घालून चिरडलं, महाराष्ट्राला हादरवणारं हत्याकांड

टिप्पर चालकासह मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  • Share this:

बुलडाणा, 29 एप्रिल : अवैध रेती वाहतूक करणार्‍या टिप्परचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसाला टिप्पर चालकाने धडक देऊन चिरडले. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी टिप्पर चालकासह मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसंच पोलिसांनी टिप्पर जप्त केले आहे.

बुधवारी पहाटे शेगाव तालुक्यातील माटरगाव, भास्तन गावाजवळील पूर्णा नदीच्या काठावर एक विना नंबरचे टिप्पर रेती घेऊन खामगाव शहरकडे जात असल्याची माहिती जलंब पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल उमेश सिरसाट यांना मिळाली. त्यानंतर उमेश सिरसाट यांनी एका होमगार्डला सोबत घेऊन मोटरसायकलने भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्परचा पाठलाग केला.

सदर टिप्पर हा माटरगाव या गावाच्या पुढे पोहोचलेला असताना पोलिसाने मोटर सायकल टिप्पर पुढे आडवी करून वाहन थांबवले. दरम्यान टिप्पर चालकाने आपले वाहन थेट पोलीस कॉन्स्टेबल उमेश सिरसाट यांच्या अंगावरून पुढे नेले आणि यानंतर त्याने टिप्परसह खामगावकडे पोबारा केला.

हेही वाचा - धक्कादायक! दारू समजून प्यायला सॅनिटायझर? साताऱ्यातील तिघांचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी घटनासथळावर पोहचले असून सकाळपासून सदर वाहनाचा शोध सुरु होता. अप्पर पोलीस अधीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद पोलिसांनी टिप्पर क्रमांक एमएच 28 बीबी -4923 ला मालकाला व टिप्पर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाही सुरू आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 29, 2020, 9:41 AM IST

ताज्या बातम्या