मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बुलडाणा जिल्ह्यातील 'त्या' तिन्ही रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यातील 'त्या' तिन्ही रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह

कोरोना संशयित म्हणून खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरू होते.

कोरोना संशयित म्हणून खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरू होते.

कोरोना संशयित म्हणून खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरू होते.

बुलडाणा, 16 मार्च : परदेशातून आलेल्या 3 रुग्णांवर कोरोना संशयित म्हणून खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरू होते. मात्र या तिन्ही रुग्णांचे रिपोर्ट नागपुरहून निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे.

दुसरीकडे, कोरोना व्हायरस हे संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने आता वेगवान पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी सायंकाळी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान पत्र पाठवून श्रींचे मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहे.

विशेष म्हणजे मागील दोन दिवसांपासून शेगावचे मंदिर 20 मार्च ते 31 मार्च पर्यंत बंद करण्यात येत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याबाबत संस्थानने मात्र या मेसेजला दुजोरा न देता भक्तांसाठी मंदिर सुरू राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थानला मंदिर बंद करण्यासंदर्भात आदेश दिले आङेत.

हेही वाचा- FACT CHECK : कोरोनाव्हायरसमुळे भारतात संपूर्ण 'लॉकडाऊन', सोशल मीडियावर फिरतायेत मेसेज, काय आहे तथ्य?

शेगाव तहसीलदार बोबडे मॅडम यांनी संस्थानला जाऊन आदेश बजावले. पोलीस चेक पोस्ट लावणार असल्याची माहिती तहसीलदार बोबडे यांनी दिली.

दरम्यान, राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 39 झाली आहे. तसंच 108 लोक विलगीकरण कक्षात दाखल असून 1063 होम क्वारंटाइन आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण 1063 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत 794 जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 717 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 39 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

First published:

Tags: Corona virus in india