भिवंडी इमारत दुर्घटना : 9 वर्षांच्या चिमुरड्यासह पाच जणांना वाचवलं

भिवंडी इमारत दुर्घटना : 9 वर्षांच्या चिमुरड्यासह पाच जणांना वाचवलं

  • Share this:

भिवंडी, 24 जुलै : भिवंडीतील खाडीपार इथं एकता चौकजवळ एक तीन मजली इमारत कोसळलीये. इमारतीच्या ढिगाराखाली काही जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून मदतकार्य सुरू आहे. बचाव पथकाने पाच जणांना ढिगाराखालून बाहेर काढलंय. अजूनही ढिगाराखाली काही जण अडकण्याची शक्यता आहे.

खाडीपार येथील एकता चौकजवळ रसुला बाग इथं एक तीन मजली  इमारत रात्री 8.30 वाजेच्या सुमारास कोसळली. इमारत कोसळल्यानंतर ही इमारतीच्या शेजारी असलेली चाळ ढिगाराखाली दबली गेली. आज दुपारीच या इमारतीच्या भिंतीला तडा जाऊन काही भाग कोसळला होता. त्यामुळे ही इमारत दुपारीच खाली करण्यात आली होती. पण ज्याची भिती होती तेच घडलं. रात्री 8.30 वाजता इमारत शेजारील चाळीवर कोसळली. घटनास्थळी भिवंडी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन केंद्र उपस्थित असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सदर ठिकाणी ठाणे महानगरपालिका अग्निशमन दलाची मदत पाठवण्यात आली आहे. तसंच एनडीआरएफ ची मदत मागवण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाराखालून पाच जणांना सुखरूप बाहेर काढलंय.

पाच जणांना वाचवलं

1)मारियम शेख 9 वर्ष

2) शाफियाबी यूसुफ (60 वर्ष)

3) मुन्नाभाई चावला (45 वर्ष)

4) मेहरुनिसा शेख (40 वर्ष)

5) जारार अहमद शेख (45 वर्ष)

हेही वाचा

Maratha Morcha Andolan: तरुणाचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

Maratha Reservation : हा आहे 69 टक्के आरक्षणाचा 'तामिळनाडू पॅटर्न' 

नारायण राणेंच्या पत्नीविरोधात अटक वाॅरंट जारी

First published: July 24, 2018, 11:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading