या पक्षाने महाराष्ट्राच्या अध्यक्षाची केली हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांचा ठपका

या पक्षाने महाराष्ट्राच्या अध्यक्षाची केली हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांचा ठपका

विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला म्हणून सुरेश साखरे यांची हकालपट्टी करण्यात आली. सुरेश साखरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या,असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला म्हणून बहुजन समाज पक्षाने महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष सुरेश साखरे यांची हकालपट्टी केली. सुरेश साखरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या,असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.

बसपाचे महाराष्ट्र प्रभारी अशोक सिद्धार्थ यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे, सुरेश साखरे यांनी निवडणूक प्रचार करण्याच्या ऐवजी, पक्षनेतृत्वाच्या इच्छेविरुद्ध स्वत: नागपूर उत्तर मधून निवडणूक लढवली आणि त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला. यामुळे पक्षाचंही मोठं नुकसान झालं.

सिद्धार्थ साखरे यांनी विरोधी पक्षांशी हातमिळवणी केली आणि जिथे पक्षाची ताकद आहे तिथे कमजोर उमेदवार उतरवले, असाही त्यांच्यावर आरोप आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून कामगिरी बजावण्यात सुरेश साखरे कमी पडले आणि त्यांनी विरोधकांना मदत केली, असा आरोप अशोक सिद्धार्थ यांनी केलाय.

(हेही वाचा : राज्याच्या निवडणुकीत कुणाला काय मिळालं?कुणी काय गमावलं? निकालाचं समग्र चित्र)

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच देशातल्या पोटनिवडणुकीतही बसपाने उमेदवार उभे केले होते. या निवडणुकांमध्येही पक्षाला अपयश आलं. उत्तर प्रदेशमध्ये जलालपूरच्या पोटनिवडणुकीतही सपाचा पराभव झाला.

=====================================================================================

मला इंग्रजी येत नाही, निकालाच्या तणावपूर्ण वातावरणात मुख्यमंत्र्यांना फुटले हसू, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 10:42 PM IST

ताज्या बातम्या