वाशिम, 18 सप्टेंबर : जिल्ह्यातील कारंजा लाड इथले रहिवासी बीएसएफ जवान सुनील ढोपे यांचा १५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. बीएसएफ म्हणतं, त्यांनी आत्महत्या केली. पण कुटुंबीयांना ते पटत नाहीये. कुटुंबीयांच्या मते, त्यांचा घातपात झाला आहे, त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि ढोपेंना शहिदाचा दर्जा द्या, अशी कुटुंबीयांची मागणी आहे.
जवान ढोपे यांचा मृतदेह 3 दिवसांपासून अमरावतीत ठेवण्यात आला आहे. दोषींवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका ढोपे कुटुंबीयांनी घेतलीय. वाशिम आणि कारंजामध्ये आज नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. हे प्रकरण दिवसागणिक गूढ होत चाललंय. त्यामुळे ढोपे यांचा मृत्यू कसा झाला? त्यांनी आत्महत्या केली? की घातपात झाला? याबाबत सध्या तरी काहीच कळायला मार्ग नाहीये.
काल सोमवारी याच कारणास्तव कारंजावासियांनी शहर बंद ठेवलं होतं. दरम्यानं, कारंजावासियांनी रोष व्यक्त करीत काल दोषी अधिकाऱ्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला होता. बीएसएफचं म्हणणं आहे की ढोपे यांनी आत्महत्या केली. दरम्यान याप्रकरणी धोपे कुटुंबीयांनी सोमवारी कारंजा शहर पोलिसात ढोपे यांची हत्या झाल्याची तक्रार दाखल केलीय. आणि जोवर दोषीवर कारवाई होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतलीय.
VIDEO: काँग्रेस आमदार नसीम खानवर गणेश मंडपात उधळवले पैसे!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BSF Jawan, Death, Karanja Lad, Suicide, Sunil Dhope, Washim