Bsc च्या विद्यार्थिनीने गळफास लावून केली आत्महत्या, आष्टी तालुक्यातील घटना

घरातील सर्व सदस्य बाहेर गेल्यानंतर एका महाविद्यालयीन तरूणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. करिश्मा रमेश बुचुडे (21 रा.डोंगरगन) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 06:23 PM IST

Bsc च्या विद्यार्थिनीने गळफास लावून केली आत्महत्या, आष्टी तालुक्यातील घटना

सुरेश जाधव (प्रतिनिधी)

बीड, 5 जून- घरातील सर्व सदस्य बाहेर गेल्यानंतर एका महाविद्यालयीन तरूणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. करिश्मा रमेश बुचुडे (21 रा.डोंगरगन) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे.

दरवाजा आतून बंद करून करिश्माने गळफास लावला. ती बीएससीचे शिक्षण घेत होती. करिश्मा हिच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मिळालेली माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे बुधवारी दुपारी हा घटना उघडकीस आली. करीश्मा ही कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयात बीएससीचे शिक्षण घेत होती. सध्या सुट्ट्या असल्याने ती घरीच होती. घरातील इतर सदस्य काही कामासाठी बाहेर गेले होते. हे पाहून करिश्माने स्वतःला संपवले. नातेवाईक घरी आल्यानंतर सर्वत्र पाहिले असता करिश्मा कुठे दिसत नसल्याचे लक्षात आले. मात्र, तिच्या खोलीचा दरवाजा बंद दिसल्याने कुटूंबियांना संशय आला. त्यांनी दरवाजा तोडल्यानंतर करिश्मा फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. याप्रकरणाची अंभोरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

हातावरची मेंदी पुसण्याआधीच नववधूचा मृत्यू

Loading...

'अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..', अशीच एक घटना गेवराई तालुक्यातील मादळमोही या गावात घडली आहे. हातावरची मेंदी पुसण्याआधीच नववधूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोमल संजय शेलार (वय-20) असे मृत्यू झालेल्या नवविवाहीतेचे नाव आहे. कोमलच्या लग्नाचा सोळावा उद्या होणार होता. मात्र त्या आगोदरच तिने जगाचा निरोप घेतला.

कोमल आणि संजयचा अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर सोळाव्याच्या एकदिवस आगोदर कोमलचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संजयच्या जीवनात अर्ध्या वरती डाव मोडला...अधुरी एक कहाणी...अशी वेळ आली आहे. कोमल घरात साफसफाई करताना तिला कुलरचा शॉक बसला. त्यात कोमलचा जागेवरच मृत्यू झाला. या दुखद घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मंगळवारी सांयकाळी बीडसह जिल्ह्यात सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यामुळे कोमल ही घरात आलेली धूळ साफ करत होती. वाऱ्यामुळे वायरच्या तार मोकळ्या होऊन कुलरमध्ये करंट उतरला होता. ते कोमलच्या लक्षात आले नाही. ती घरातील केर काढत असताना तिला कुलरचा शॉक लागला. त्यातच कोमलचा जागेवर मृत्यू झाला.


शौचालयाच्या टाईल्सवर महात्मा गांधींचा फोटो, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2019 06:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...