मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बिअर पाजली अन् नंतर वाहिला रक्ताचा पाट, नाशकात सराईत गुन्हेगाराला स्मशानभूमीजवळच संपवलं

बिअर पाजली अन् नंतर वाहिला रक्ताचा पाट, नाशकात सराईत गुन्हेगाराला स्मशानभूमीजवळच संपवलं

ज्या ठिकाणी प्रवीणचा मृतदेह आढळून आला होता. त्या ठिकाणी रिकाम्या बिअरच्या बाटल्या सापडल्या आहे.

ज्या ठिकाणी प्रवीणचा मृतदेह आढळून आला होता. त्या ठिकाणी रिकाम्या बिअरच्या बाटल्या सापडल्या आहे.

ज्या ठिकाणी प्रवीणचा मृतदेह आढळून आला होता. त्या ठिकाणी रिकाम्या बिअरच्या बाटल्या सापडल्या आहे.

  • Published by:  sachin Salve

नाशिक, 22 नोव्हेंबर : नाशिक (nashik) जिल्ह्यातील म्हसरुळ पोलीस स्टेशनच्या (Mhasrul Police Station) हद्दीत अट्टल गुन्हेगाराची निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. जामिनावर आलेल्या या गुन्हेगाराचा पार्टीच्या बहाण्याने बोलावून धारधार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  प्रवीण गणपत काकड (Praveen Ganpat Kakad) असं खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.  मयत प्रवीणची काही दिवसांपूर्वीच जामिनावर मुक्तता झाली होती.  प्रवीण हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर खून खुनाचा प्रयत्न अशे गंभीर गुन्हे दाखल होते.

कामाची पाहणी करत असताना 8 व्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू,भिवंडीतील घटना

म्हसरुळ-आडगाव लिंकरोडवर असलेल्या स्मशानभुमीपासून काही दूर अंतरावर एका मोकळ्या जागेत त्याचा मृतदेह आढळून आला आहे.  ज्या ठिकाणी प्रवीणचा मृतदेह आढळून आला होता. त्या ठिकाणी रिकाम्या बिअरच्या बाटल्या सापडल्या आहे. तसंच एक मोपेड सुद्धा आढळून आली आहे. ओली पार्टी केल्यानंतर प्रवीणची हत्या करण्यात आली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात दोन ते तीन जणांनी मिळून प्रवीणचा खून केला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Shocking Eviction : बिग बॉस मराठीच्या घरातील सारंगे गर्ल स्नेहा वाघ आऊट

घटनास्थळा पंचनामा केल्यानंतर प्रवीणचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर गावित, म्हसरूळ पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत कुमार सुर्यवंशी गुन्हे शोध पथक आदी कर्मचारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

First published: