मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : नंदुरबारमधील सिंदीदिगर घाटात क्रुझर गाडी दरीत कोसळली, 8 ठार, मृतांची संख्या वाढण्याची भीती

BREAKING : नंदुरबारमधील सिंदीदिगर घाटात क्रुझर गाडी दरीत कोसळली, 8 ठार, मृतांची संख्या वाढण्याची भीती

जवळपास पंधराहून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहीत समजत आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

जवळपास पंधराहून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहीत समजत आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

जवळपास पंधराहून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहीत समजत आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

  • Published by:  sachin Salve

निलेश पवार, प्रतिनिधी

नंदुरबार, 18 जुलै : नंदुरबार (Nandurbar ) जिल्ह्यातील तोरणमाळ खोऱ्याचा अतिदुर्गम  भाग असणाऱ्या सिंदीदिगर घाटात ( Sindhidigar ghat) प्रवासी वाहतूक करणारी एक क्रुझर गाडी (Cruiser crashes) दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या गाडीत 30 जण प्रवास करत होते.  जवळपास पंधराहून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहीत समजत आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहतूक करणारी खाजगी क्रुजर गाडी सिंदी दिगर घाटात  खोल दरीत कोसळली.  सायंकाळीच्या सुमारास ही क्रुझर गाडी या घाटातून प्रवाशांना घेवून जात होती. त्यावेळी हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पूर्ण चुराडा झाला आहे. या गाडीत असलेल्यांपैकी 8 जणांचा मृत्यू झाला आहे. गाडी दरीत कोसळली तेव्हा काही जणांनी जीव वाचवण्यासाठी गाडीतून बाहेर टाकल्यात. त्यामुळे जबर मार लागून अनेक काही जखमी झाले आहे तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. दरीत ज्या ठिकाणाहून गाडी खाली कोसळली त्या वाटेत ठिकठिकाणी प्रवाशांचे मृतदेह पडून होते.

सावधान ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा 60 लाख लोकांना बसणार फटका - टोपे

या गाडीत 30 प्रवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर  मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. क्रुझर गाडी दरीत कोसळल्याने बचाव आणि मदत कार्याला मोठा अडथळा येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्यासाठी धाव घेतली आहे.

IND vs SL : टीम इंडियाची 'कमजोरी', झिम्बाब्वेपेक्षाही खराब कामगिरी

अतिशय खडतर असलेल्या या भागात आताच पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून रस्ता बनला आहे.  स्वातंत्र्यांनतंर पहिल्यांदाच हा भाग तोरणमाळसोबत जोडला गेला आहे. मात्र, असे असले तरी अवघ्या सहाच महिन्यात या रस्तावर हो दुसरा भीषण अपघात झाला आहे. विशेष म्हणजे, हा सगळा भाग कव्हरेज क्षेत्राबाहेर असल्याने आणि खडतरही असल्याने याठिकाणी मदतकार्य करण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहे. पोलीस प्रशासन स्थानिकांच्या मदतीने याठिकाणी बचावकार्य राबवत असून जखमींना तोरणमाळ, म्हसावद याठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात हलवल्या जात आहे. तर जिल्हा मुख्यालयातून पोलीस अधिक्षकांसह अनेक अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत, प्रशासनाने अद्यापही कुठलीही माहिती दिली नसून याठिकाणी कव्हरेज नसल्यानेच माहिती मिळण्यात देखील अडसर निर्माण होत आहे.

First published: