सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी, यावरून पालघरमध्ये भावाने केली भावाची हत्या

सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी, यावरून पालघरमध्ये भावाने केली भावाची हत्या

पालघरमध्ये सख्खा भाऊ पक्का वैरी, या म्हणीचा प्रत्यय आला आहे. आपल्या मालकीच्या झाडवरील आंबे तोडल्याच्या रागातून भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

पालघर, 19 जून- पालघरमध्ये सख्खा भाऊ पक्का वैरी, या म्हणीचा प्रत्यय आला आहे. आपल्या मालकीच्या झाडवरील आंबे तोडल्याच्या रागातून भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिलीप पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी जयवंत पाटील त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे हे प्रकरण?

वाडा तालुक्यातील पालसईत येथे बुधवारी ही घटना घडली आहे. दिलीप पाटील यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या आंब्याच्या झाडाचे आंबे पाडले. याचा राग मनात धरून त्यांचा सख्खा भाऊ जयवंत पाटील यांनी जाब विचारत हातातील दांडक्याने दिलीप यांना बेदम मारहाण केली. यात दिलीप हे गंभीर जखमी झाले. दिलीप यांना वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दिलीप यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील जेजे हॉस्पिटलमध्ये नेण्यास डॉक्टरांनी सांगितले. मात्र, त्याआधीच दिलीप यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाडा पोलीसस्टेशनमध्ये जयवंत पाटील व त्यांची पत्नी जयश्री जयवंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नी आणि मेहुण्याचा खून

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीसह मेहुण्याचा खून केल्याची घटना लातूर जिल्ह्यातील भातांगळी येथे घडली आहे. सासरवाडीत जाऊन जावयाने पत्नी आणि मेहुण्याची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. सुवर्ण भोपळे आणि युवराज निरुडे अशी मृत झालेल्या बहिण-भावांची नावे आहेत. आरोपी विकास भोपळे याला पोलिसांनी अटक केली असून अधिक चौकशी करत आहेत. पत्नी आणि मेहुण्याची हत्या केल्यानंतर विकास भोपळेने स्वतः पोलिसांत जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेने आता सुवर्णाची दोन चिमुकली मुले आईच्या ममतेला पोरकी झाली आहेत.

SPECIAL REPORT: अबब! 20 नंबरचा बूट तुम्ही कधी पाहिलाय का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2019 12:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading