लॉकडाउनमुळे भावाला दिली घरात जागा, पण भावाने काढला बहिणीचा काटा

लॉकडाउनमुळे भावाला दिली घरात जागा, पण भावाने काढला बहिणीचा काटा

जमिनीच्या वादातून या भावाने आपल्याच बहिणीची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

किरण मोहिते, प्रतिनिधी

सातारा, 27 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाउन करण्यात आला आहे. अनेक जण लॉकडाउनमुळे आहे त्या ठिकाणी अडकले आहे. साताऱ्यात एक भाऊ आपल्या बहिणीच्या घरी अडकला होता. पण, जमिनीच्या वादातून या भावाने आपल्याच बहिणीची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे.

साताऱ्यातील संगम माहुली इथं ही धक्कादायक घटना घडली.  मुंबईमध्ये राहणारा आरोपी नंदकुमार माने याने आपल्या बहिणीचा धारधार चाकूने खून केला आहे.

हेही वाचा - नागपूर हादरलं! लेकानेच वडिलांचं कापलं गुप्तांग, बोलत होता हिंदी सिनेमातले डायलॉग

लॉकडाउनमुळे आरोपी नंदकुमार माने मुंबई वरुण आपल्या बहिणीच्या घरी आला होता. मात्र, दोघांमध्ये पुन्हा वडिलांच्या प्रॉपर्टीवरून वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नंदकुमार याने वंदना शिंदे यांचा चाकूने भोसकून खून केला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत वंदना शिंदे आणि आरोपी नंदकुमार यांच्यात दिवाळीपासून वडिलांच्या प्रॉपटीवरून वाद सुरू होता. वडिलांच्या नावे असलेला मुंबईतील फ्लॅट आणि वडिलांची जमिनीची मागणी वंदना यांनी केली होती. पण, नंदकुमार याने देण्यास यावरून नकार दिला होता. दोघांमध्ये यावरून बऱ्याच वेळा वाद झाला होता. रविवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा एकदा वडिलांच्या प्रॉपटीवरून वाद झाला. त्यानंतर पहाटे भावाने बहिण झोपेत असताना धारदार चाकूने सपासप वार करून खून केला.

हेही वाचा - गंभीर आजाराच्या रुग्णांना फटका बसू नये म्हणून करण्यात आलं 'हे' आवाहन

या घटनेची माहिती मिळताच  सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नंदकुमारला अटक केली आहे. मृत वंदना शिंदे यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: April 27, 2020, 12:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading