मनोरूग्ण भावाला डॉक्टराकडे दाखवून येत होता भाऊ, वाटेत दगडाने ठेचून केला खून!

मनोरूग्ण भावाला डॉक्टराकडे दाखवून येत होता भाऊ, वाटेत दगडाने ठेचून केला खून!

दिलीप इंगोलेचा चुलत भाऊ फरार असल्यानं संशयाची सुई त्याच्याकडे फिरत आहे.

  • Share this:

किशोर गोमासे, प्रतिनिधी

वाशिम, 11 जानेवारी : जिल्ह्याच्या मंगरूळपीर तालुक्यातील बाळदेव परिसरातील नाल्यात दिलीप इंगोले या 47 वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून दिलीप इंगोलेचा चुलत भाऊ फरार असल्यानं संशयाची सुई त्याच्याकडे फिरत आहे.

बाळदेव परिसरातील रस्त्यालगतच्या नाल्यात नागरिकांना दगडाने ठेचून मारून टाकलेल्या एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. मंगरुळपीर पोलीस घटनास्थळी गेल्यावर मृतक हा मोहरी येथील दिलीप इंगोले असल्याची माहिती मिळाली. दिलीप इंगोले हे आपला चुलत भाऊ संतोष इंगोले यास त्याच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी अकोला येथील डॉक्टरकडे घेऊन गेले होते.

त्यानंतर ते दोघे शेलु बाजार वरून मोहरी आपल्या गावाकडे रात्री 10 च्या सुमारास दुचाकी ने येत असताना दुचाकी पंचर झाली. त्यावेळी संतोष इंगोले हा गाडीवरून उतरून बाळदेव परिसरातील नाल्यातून पळत असल्याचं दिलीप इंगोले यांनी त्यांचा चुलत भाऊ मंगेश इंगोले यांना मोबाईलवरून सांगितलं होतं. त्यांनतर दिलीप इंगोले आणि संतोष इंगोले या दोघांचेही मोबाइल बंद येत होते.

आज सकाळी बाळदेव परिसरातील नाल्यात डोक्यामध्ये दगड घालून निर्घृण खून केलेल्या अवस्थेतील दिलीप इंगोले चा मृतदेह आढळला असून चुलत भाऊ संतोष इंगोले हा फरार असल्याने त्याच्यावर संशयाची सुई फिरत असून हा खुन कुणी आणि कशासाठी केला याचा शोध मंगरुळपीर पोलीस घेत आहेत.

लेकीवर सगळ्यात जास्त माया करणाऱ्या बापानेच केला बलात्कार, कोल्हापुरातलं धक्कादायक प्रकरण

कोल्हापूरमध्ये महिला अत्याचाराचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बापानेच पोटच्या लेकीवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. अवघ्या 7 वर्षीय मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 7 वर्षीय चिमुकलीवर तिच्याच वडिलांकडून बलात्कार करण्यात आला आहे. पत्नीच्या सतर्कतेमुळे हा गंभीर प्रकार उघड झाला आहे. पत्नीकडून नराधम पतीविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपी नराधम बापाला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे.

देशात गेल्या काही दिवसांपासून वारंवार महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यात जर मायेचा हात फिरवणाऱ्या बापानेच असा प्रकार केला तर मुली घरातही सुरक्षित नाही असं म्हणावं लागेल. घरातील वडिलच जर लेकीवर असा अत्याचार करत असेल तर मुलींनी कुठे जावं हा मोठा प्रश्न आहे. या सगळ्यामुळे संतप्त नागरिकांनी नराधमाला बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.

Published by: sachin Salve
First published: January 11, 2020, 8:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading