सख्खा भाऊ निघाला वैरी! जमिनीच्या तुकड्यासाठी भावानं केला भावावर कुऱ्हाडीनं वार

सख्खा भाऊ निघाला वैरी! जमिनीच्या तुकड्यासाठी भावानं केला भावावर कुऱ्हाडीनं वार

लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागात जमिनीच्या वादांनी तर परिसीमाच गाठली आहे.

  • Share this:

कल्याण, 29 जून: शेतीच्या वादातून सख्ख्या भावाने आपल्या मुलांच्या मदतीने भाऊ आणि काकांच्या अंगावर चारचाकी वाहन चढवत त्यांच्यावर कुऱ्हाडीनं हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

कल्याण जवळील मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या खरड गावातील घटना समोर आली आहे. वसंत म्हात्रे आणि त्यांचा मुलगा नितीन म्हात्रे या दोघांनी वंडार म्हात्रे यांच्या अंगावर चारचाकी वाहन चढवलं. यात वंडार म्हात्रे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा...भीषण अपघातात चिमुकल्यासह वडिलांचा जागीच मृत्यू, मुलगी आणि मेहुणा गंभीर

खरड गावात एका सख्ख्या भावानं दुसऱ्या भावाचं भावावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत वंडार म्हात्रे हे गंभीर जखमी झाले आहेत. वडील कुऱ्हाडीने मारत असताना मुलाने देखील काकांच्या अंगावर चारचाकी वाहन टाकल्याने त्यांच्या पायाला, हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ग्रामीण भागात जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे जमिनीची विक्री केल्यानंतर त्यांचे हिस्से करत असताना मोठे गुन्हे सुद्धा झाले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागात जमिनीच्या वादांनी तर परिसीमाच गाठली आहे. शनिवारी सकाळी वंडार म्हात्रे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात त्यांची दोन मुलं थोडक्यात बचावली आहेत. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ होता होता टळला आहे. हिललाईन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देसले यांनी धाव घेतल्याने वादावर पडत टाकण्यात आला. जखमी झालेल्या वंडार म्हात्रे याना तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केल्याचे त्याचे जीव वाचले आहे. मात्र मोकाट असलेले आरोपी वसंत म्हात्रे आणि नितीन म्हात्रे यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचे वंडार म्हात्रे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा... काय लॉक आणि काय अनलॉक! सरकार पूर्णपणे कन्फ्युज; देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका

वसंत म्हात्रे आणि त्याचा मुलगा नितीन म्हात्रे याना अजून अटक झालेली नाही. त्यामुळे आता रुग्णालयातून पुन्हा घरी गेला की मला ते ठार मारणार अशी धमकीच आरोपींनी दिली असल्याची माहिती वंडार म्हात्रे यांनी दिली आहे. या प्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

First published: June 29, 2020, 9:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading