रायचंद शिंदे, जुन्नर 13 ऑगस्ट : दोन दिवसांवर आलेला रक्षाबंधन हा सण बहीण-भावासाठी सगळ्यात महत्त्वाचा सण. बहिण आपल्या रक्षणासाठी भावाला राखी बांधून रक्षण करण्याचं वचन घेत असते. मात्र याच नात्याला आंबेगाव तालुक्यातील खडकी गावात गालबोट लागलं. सख्ख्या मावस बहिण-भावाने आत्महत्या केल्याने खळबळ उडालीय.अक्षय अशोक जाधव (वय 24) आणि ऋतुजा उत्तम तट्टू (वय 19) असं आत्महत्या केलेल्या तरुण-तरुणीचं नाव आहे. अक्षयने आत्महत्या करण्याआधी फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्येसाठी स्वत:च्या नातेवाईकांना जबाबदार धरलंय.
अक्षय हा मुंबई येथे राहणार तरुण आहे तर ऋतुजा आंबेगाव तालुक्यातील खडकी येथे राहणारी तरुणी असुन दोघेही नात्याने सख्खे मावस बहिण-भाऊ आहेत. मात्र या दोघां बहिणभावाच्या एकत्रित आत्महत्येत प्रेमप्रकरण असल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केलाय.
'जनाची नाही तर मनाची असेल तर CMनी त्या दोन मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा'
अक्षय हा मंबईवरुन रात्रीच्या सुमारास आला होता त्यानंतर खडकी येथील शंकराच्या मंदिराजवळ असलेल्या विहिरीत अक्षय आणि ऋतुजाने आत्महत्या केली. या दोघांचे मृतदेह विहिरीत तरंगू लागले. स्थानिक नागरिकांना घटनेची माहिती कळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलीस आता दोघांच्याही नातेवाईकांची चौकशी करत असून लवकरच सत्य बाहेर येईल असंही पोलिसांनी सांगितंय.
अख्खा महाराष्ट्र रडतोय अन् भाजपचे 'हे' आमदार नाचगाण्यात दंग!
नशेखोर मुलाने केली वडिलांची हत्या
सोलापूर- नशेच्या आहारी गेलेल्या मुलाने आपल्या जन्मदात्या बापालाच संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. दारु प्यायला पैसे न दिल्याने मुलाने बापावर कुऱ्हाडीने वार केले. त्यात बापाचा जागेवरच मृत्यू झाला. रामचंद्र बनसोडे असे या मृत वडिलाचे नाव आहे.
पूरग्रस्तांसाठी केंद्राला मागणार 6 हजार कोटी, मंत्रिमंडळाचे 10 महत्त्वाचे निर्णय
अक्कलकोटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी मल्लिनाथ बनसोडे हा बेरोजगार असून पूर्णतः नशेच्या आहारी गेला होता. त्यामुळे सातत्याने घरात पैशाची मागणी करत होता. घरात कमविणारे कोणीही नसल्याने वडीलाने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर चिडलेल्या मल्लिनाथने सुरूवातीला आपल्या वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण करूनही त्याचा राग शांत झाला नाही. त्याने घरातील कुऱ्हाडीने वडिलावर वार करुन त्यांची निर्घृण हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मल्लिनाथ याला अटक केली आहे.