• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • उरण-पनवेल मार्गावर बांधकामादरम्यान पुलाचा गर्डर कोसळला, 5 जण जखमी VIDEO

उरण-पनवेल मार्गावर बांधकामादरम्यान पुलाचा गर्डर कोसळला, 5 जण जखमी VIDEO

 जासईन गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरू होते. बांधकामादरम्यान गर्डर कोसळला.

जासईन गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरू होते. बांधकामादरम्यान गर्डर कोसळला.

जासईन गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरू होते. बांधकामादरम्यान गर्डर कोसळला.

  • Share this:
पनवेल, 02 नोव्हेंबर : सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना पनवेलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.  उरण -पनवेल मार्गावर ( Uran-Panvel road) पुलाच्या बांधकामातील लोखंडी सांगाडा (girder collapses) कोसळला. या दुर्घटनेमध्ये 5 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींपैकी एक जण गंभीर असून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईहून पनवेलकडे जाणाऱ्या महामार्गावर ही घटना घडली आहे. संध्याकाळच्या सुमारास ही घडली. जासईन गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरू होते. बांधकामादरम्यान गर्डर कोसळला. पुलाच्या बांधकामातील लोखंडी सांगडा थेट खाली कोसळला. अचानक झालेल्या या घटनेमुळे भलामोठा आवाज झाला. त्यामुळे नेमकं काय घडलं म्हणून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर पुलाचे काम करणारे 5 जण जखमी झाले आहे. जखमींपैकी एका जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना तातडीने  जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाण्यात बुडत होता कुत्रा, जीवावर खेळत माणसानं वाचवले प्राण; पाहा VIDEO उरण मार्गावर या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे जवान पोहोचले आहे. क्रेनच्या मदतीने कोसळलेला लोखंडी सांगाडा बाजूला हटवण्याचे काम सुरू आहे.
Published by:sachin Salve
First published: