Home /News /maharashtra /

नवरी नटली अन् थेट जेसीबीतून मांडवात अवतरली...! नवरीच्या हटके एंट्रीची सर्वत्र चर्चा

नवरी नटली अन् थेट जेसीबीतून मांडवात अवतरली...! नवरीच्या हटके एंट्रीची सर्वत्र चर्चा

लग्नसोहळ्याचा विचार केला तर त्याठिकाणी लग्नात कुणी क्रेन किंवा लिफ्टच्या माध्यमातून जमिनीच्या खालून तर कुणी हेलिकॉप्टरद्वारे थेट आकाशातून मांडवात दाखल होतात.

    विजय कमळे पाटील, प्रतिनिधी जालना, 5 जुलै : नवरी मुलीला तुम्ही कारमध्ये लग्नमंडपात (Marriage) आल्याचे वाचले असेल. काही ठिकाणी नवरी ही ट्रॅक्टरवर (Bride on tractor) ही लग्नमंडपात आली आहे. मात्र, जालना जिल्ह्यात एक लग्न झाले. या लग्न सोहळ्यात नवरीने एक अशी हटके एंट्री (Bride Hatke Entry in Marriage) केली आहे, जिची संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा होत आहे. (Bride Entry on JCB in Marriage) नवरीने लग्नसोहळ्यात केली हटके एंट्री लग्नसोहळ्याचा विचार केला तर त्याठिकाणी लग्नात कुणी क्रेन किंवा लिफ्टच्या माध्यमातून जमिनीच्या खालून तर कुणी हेलिकॉप्टरद्वारे थेट आकाशातून मांडवात दाखल होतात. जालन्यात देखील अशा एका लग्नातील नवरीच्या हटके एन्ट्रीची जोरदार चर्चा सुरू आहे. तर ही बातमी आहे जालना येथील प्रसिध्द केशरोग तज्ञ डॉ. विठ्ठल राजकर यांच्या कन्या वृषाली हिच्या लग्नाची. डॉ. विठ्ठल राजकर यांच्या कन्येचा विवाहसोहळा जालना शहरापासून जवळच असलेल्या जामवाडी या त्यांच्या मूळगावी मोठ्या उत्साहात पार पडला. दरम्यान, यावेळी सोळा शृंगार करून नटून थटून आलेल्या वृषाली या नवरीने थेट जेसीबी मधून फटांक्यांच्या नयनरम्य आतिषबाजीत मांडवात एंट्री केली आणि सर्वांना आश्चर्यचकित केले. या लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा आहे. हेही वाचा - Aurangabad : BAMU मध्ये 'हा' कोर्स करताच मिळेल 40 लाखांचं पॅकेज असणारी नोकरी; कसा घ्याल प्रवेश? आपल्या विवाह सोहळ्याला अविस्मरणीय करण्यासाठी वर आणि वधू पक्षांकडून वेगवेगळ्या क्लुप्त्या आजमविण्यात येतात. आता वेडिंग शुटचेही अनेक प्रकार निघाले आहेत. प्री वेडिंग शुट आणि पोस्ट वेडिंग शुट लग्न जमल्यावर केले जात असल्याचे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आता जालन्यात झालेल्या या लग्नसोहळ्यात नवरी मुलगी वृषालीने थेट जेसीबीच्या माध्यमातून लग्नसोहळ्यात एंट्री केली. या लग्नसोहळ्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bride, Marriage

    पुढील बातम्या