मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

RTO अधिकाऱ्याने 3 वर्षांत जमवली कोट्यवधींची माया, ACBने केली कारवाई

RTO अधिकाऱ्याने 3 वर्षांत जमवली कोट्यवधींची माया, ACBने केली कारवाई

तीन वर्षांपासून प्रादेशिक परिवहन विभागात काम करणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्याविरुद्ध एसीबीने कारवाई केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Published by:  Suraj Yadav

नागपुर, 28 डिसेंबर : प्रादेशिक परिवहन विभागात सहायक मोटर वाहन निरीक्षकाकडे तब्बल 1 कोटी 71 लाख रुपयांची बेहिशोबी संपत्ती सापडली आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रादेशिक परिवहन विभागात काम करणाऱ्या या अधिकाऱ्याला गेल्या वर्षी लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मिथुन रामेश्वर डोंगरे असं संबंधित अधिकाऱ्याचे नाव आहे. सध्या मुंबईत कार्यरत असणाऱ्या डोंगरे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विबागाने कारवाई केली होती.

नागपुरमध्ये कार्यरत असताना वाहन परवाना देण्यासाठी मिथुन डोंगरे यांनी दलाल मुकेश रामटेके यांच्या मदतीने दोन हजारांची लाच घेतली होती. या प्रकरणी त्यांना 24 एप्रिल 2018 ला अटकही झाली होती. दोघांविरोधात सीताबर्डी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, एसीबीच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानी झडती घेतली. यामध्ये एसीबीला 1 कोटी 71 लाख रुपयांची संपत्तीची कागदपत्रे सापडली. त्यानंतर मिथुन डोंगरे यांची चौकशी सुरू केली. यावेळी त्यांनी जिथं काम केलं त्या विभागाकडूनही माहिती घेतली.

डोंगरे यांच्या उत्पन्नाचे स्रोत आणि त्यांच्याकडे असलेली संपत्ती यांचा तपास करण्यात आला. यामध्ये त्यांनी कमी कालावधीत पदाचा गैरवापर करून 1 कोटी 22 लाख 25 हजार 641 रुपयांची संपत्ती जमवल्याचं आढळून आलं. यानंतर डोंगरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरटीओमध्ये तीन वर्षांपूर्वी नोकरीला लागलेल्या मिथुन डोंगरे यांचे याआधी शिकाऊ वाहन परवाना घोटाळ्यातही नाव आले होते. सप्टेंबरमध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं डोंगरे यांच्यासह 17 आरटीओ अधिकारी आणि दलालांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.

वाचा : ऊसतोड कामगार 30 हजार महिलांनी गर्भाशयं काढली, नितीन राऊतांनी दिली माहिती

First published:

Tags: Bribe, RTO