• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • BREAKING : शिवसेनेला भिवंडीत खिंडार, मोठ्या नेत्याने दिला राजीनामा, काँग्रेसची धरली वाट?

BREAKING : शिवसेनेला भिवंडीत खिंडार, मोठ्या नेत्याने दिला राजीनामा, काँग्रेसची धरली वाट?

बाळ्या मामा यांनी शिवसेना पक्ष सदस्य पदासह जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

  • Share this:
भिवंडी, 29 मे : माथेरान नगरपालिकेत (matheran nagar palika)  10 नगरसेवक भाजपच्या (BJP) गळाला लागल्याची घटना ताजी असताना आता भिवंडीत (Bhiwandi) शिवसेनेला (Shisena) मोठे खिंडार पडले आहे.  सेनेचे नेते सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) उर्फ बाळ्या मामा यांनी शिवसेना पक्ष सदस्य पदासह जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात दबदबा असलेले शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शिवसेना पक्ष सदस्यत्वासह आपला ठाणे जि.प.सदस्यत्वाचा राजीनामा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे शनिवारी दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे. भारतातील सर्वसाधारण नोकरी करणारे तीन तरुण क्रिप्टोकरन्सीमुळे झाले अब्जाधीश 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना सेनेच्या पक्षश्रेष्ठींनी कारवाई करत तब्बल 2 वर्षे त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपविली नव्हती. सेनेच्या या दुर्लक्षित धोरणामुळे बाळ्या मामा यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी होती. अखेर आपले व्यक्तिगत कारण पुढे करत सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शिवसेना सदस्य पदाबरोबरच आपला जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बाळ्या मामा यांच्या घरी आले होते. तेव्हापासूनच बाळ्या मामा हे काँग्रेस मध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच आता बाळ्या मामा यांनी आपला राजीनामा दिल्यामुळे ते काँग्रेससोबत घरोबा करणार असल्याची चर्चा सध्या तालुक्यासह जिल्ह्यात सुरू आहे. त्याचबरोबर आगामी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच बाळ्या मामा यांनी हा राजीनामा दिला असल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ खिंडार पडणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. 'बिग बॉस 15' ची प्रतीक्षा लवकरच संपणार, 'या' स्पर्धकांचा असणार समावेश सुरेश म्हात्रे हे धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करीत असून मदत कार्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असल्याने त्यांना मानणारा मोठा जनसमुदाय असून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात त्यांना मनाचे स्थान आहे. मात्र, शिवसेनेत त्यांना नेहमीच डावलण्यात येत असल्याने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी ही भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याचा फटका शिवसेनेला चांगलाच बसणार आहे एवढे मात्र नक्की.
Published by:sachin Salve
First published: