Home /News /maharashtra /

आता पूर्ण आसन क्षमतेनं धावणार महाराष्ट्राची 'लालपरी', पण.. हे नियम बंधनकारकच

आता पूर्ण आसन क्षमतेनं धावणार महाराष्ट्राची 'लालपरी', पण.. हे नियम बंधनकारकच

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चच्या अखेरीस संपूर्ण देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर एसटीची चाकेही थांबली होती.

मुंबई, 17 सप्टेंबर: कोरोनामुळे संकटांत सापडलेली महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी बस आता पूर्ण आसन क्षमतेने धावणार आहे. उद्यापासून ( 18 सप्टेंबर) पूर्ण आसन प्रवासी वाहतूक करण्यास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला राज्य सरकारकडून परवानगी मिळाली आहे. पण प्रवासादरम्यान प्रत्येक प्रवाशानं मास्क लावणे, सॅनिटायझ करणे बंधनकारक असणार आहे. मुलीवरून भांडण! तरुणानं पेट्रोल ओतून वडिलांना जिवंत जाळलं, बदलापूर जवळील घटना एसटीने या आधी 50 टक्के प्रवासी वाहतूक केली जात होती. आता पूर्ण आसन क्षमता वापर होणार आहे. यामुळे कोरोना धोका वाढू शकतो, अशी भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या नियमानुसार 20 ऑगस्टपासून सामाजिक अंतर राखून आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रमाणे आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्यास एसटीला परवानगी दिली होती. आधीच तोट्यात असलेली एसटी त्यात कमी प्रवाशांची वाहतूक आणि अधिक तिकीट यामुळे प्रवासी बरोबर एसटी महामंडळ दोघेही तोटा सहन करत होते. एसटी विभागांकडून टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. कर्नाटक आणि गुजरात राज्यात 100 टक्के प्रवाशी वाहतूक सुरू केल्यानंतर आता एसटीला पूर्ण आसनक्षमतेने वाहतूक करण्यास राज्य सरकारनं मंजुरी मिळाली आहे.   प्रवाशांना हे बंधनकारक... -बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क व सॅनिटाईझर वापरणं बंधनकारक आहे. -वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस निर्जंतूक करण्यास मार्गस्थ करण्यात याव्यात. -लांब आणि मध्यम लांब पल्ल्याच्य बसेससाठी एका आसनावर एक प्रवाशी अशा तिरप्या (Z) पद्धतीनं आरक्षण उपलब्ध आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी रास्ता रोको करणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हा दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चच्या अखेरीस संपूर्ण देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर एसटीची चाकेही थांबली होती. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. एवढंच नाही तर एसटीला हजारो कोटींचा फटका बसला होता. लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय कामगार व मजुरांना राज्याच्या सीमेवर सोडण्यासाठी, राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी, ऊसतोड कामगारांना घरी पोहोचवण्यासाठी व अत्यावश्यक सेवा देण्यासाठी एसटी धावत होती. मात्र, त्यानंतर आता एसटी सर्वांसाठीच धावणार आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: S T BUS, St bus

पुढील बातम्या