मुंबई, 17 ऑक्टोबर: राज्यात कोरोनाचा संसर्ग असताना अनेक सण आणि उत्सवांवर बंधनं घालण्यात आली आहेत. लोकांची गर्दी होऊ नये, याची प्रशासनाकडून खबरदारीही घेतली जात आहे. मात्र, शिवसेनेनं दसरा मेळाव्याची तयारी सुरू केली आहे. त्यात दसरा मेळाव्याबाबत खासदार संजय राऊत यांनी असं मोठं विधान केलं आहे. यावर भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी खोचक टीका केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सभा उद्घाटन पॅटर्न बदलू नये. राम मंदिर ऑनलाईन उद्घाटन करा, असं म्हणणारे संजय राऊत दसरा मेळावा जाहीर का घेत आहेत? असा सवाल देखील प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा...देवेंद्र फडणवीसही उतरले मैदानात! शरद पवारांच्या बारामतीपासून सुरू करणार दौराकंगना रणौतपासून भाजप दोन हात दूर..
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने कंगना रणौत हिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. मात्र, कंगना रणौत हिच्या पेक्षाही राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याकडे आधी लक्ष द्या, हे सांगत भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी कंगनाच्या चौकशीबाबत बोलणं टाळलं.
प्रवीण दरेकर म्हणाले की, महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. असं असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी बसून नुकसानाचा आढावा घेत आहेत, अशी टीका केली. आम्ही राज्यातील 9 जिल्ह्यात 900 किलोमीटरवर दौरा करणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली. पण याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. आपत्ती करता मदतीसाठी उठसूठ केंद्र सरकारकडे जाऊ नका. राज्याने जबाबदारी घ्यावी, असा टोला देखील दरेकरांनी सरकारला लगावला.
जलयुक्त शिवार योजनेबाबत बोलताना दरेकर यांनी सांगितलं की, जलयुक्त शिवार योजना यशस्वी आहे. याबाबत लवकरच सत्य बाहेर येईल. जलयुक्त शिवार चौकशी आणि सिंचनाची ईडीची चौकशी याचा काही संबंध नाही. ईडी त्यांचं काम करत आहे, असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
काय आहे संजय राऊत यांचं मोठं विधान...?
दरम्यान, दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्यासपीठावरून भाषण देतील, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
संजय राऊत यांनी सांगितलं की, दसरा मेळावा घेण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे.
हेही वाचा...सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप भोवले, मुंबई पोलिसांनी केली वकिलाला अटक
दसरा मेळाव्याचं महत्त्व राजकीय आणि सांस्कृतिक देखील आहे. त्यामुळे दसरा मेळावा कसा घ्यायचा याबाबत चर्चा होईल. नियम आणि आरोग्याच्या दृष्टीनं योग्य होईल, अशा पद्धतीनं नियोजन केलं जाईल, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहार निवडणुकांसाठी 12 सभा नियोजित आहेत. या सभा कशा पद्धतीनं होणार हे बघितलं पाहिजे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टोला लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.