शिवसेनेचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

शिवसेनेचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

शिवसेनेचे दिग्गज नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर: राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात आता शिवसेनेचे दिग्गज नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत खुद्द एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील ज्यूपीटर हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा...धक्कादायक! पुण्याच्या आयटी हबमध्ये अमली पदार्थांची विक्री; 25 किलो गांजा जप्त

'काल मी माझी कोविड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती...' असं एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मात्र, त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना ठाण्यातील ज्यूपीटर हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. गेले काही दिवस एकनाथ शिंदे सातत्याने कोविड 19 केअर हाँस्पिटलमध्ये पीपीई कीट घालून पहाणी करत होते. त्यामुळे त्यांना कोविड 19 चा संसर्ग झाल्याची शक्यात व्यक्तं केली जात आहे.

शिवसेनेत शोककळा...कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर देवळेकर यांचं निधन

दरम्यान, कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. देवळेकर यांच्या जाण्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवळेकर यांना कोरोनाची लागण झाली होती. पण त्यानंतर ते त्यातून बरेही झाले होते. पण यादरम्यान त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी देवळेकर यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. मात्र देवळेकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. देवळेकर यांच्या जाण्याने कल्याण डोंबिवलीतील एक अभ्यासू, मनमिळावू आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारा लोकप्रतिनिधी गमावल्याची खंत व्यक्त होत आहे.

हेही वाचा...कंगनाच्या याचिकेवर उद्यापासून सुनावणी, संजय राऊतांना मात्र 1 आठवड्याची मुदत

देवळेकर यांच्या निधनाबाबत सर्वपक्षीय राजकारणी, लोकप्रतिनिधीनी शोक व्यक्त केला आहे. खरंतर, कोरोनाच्या या संकटात काम करणाऱ्या अनेक नेत्यांना, आरोग्य देवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना कोरोनाने वेढलं आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गाला हरवण्यासाठी संपूर्ण देश सध्या प्रयत्नात आहे. यासाठी प्रत्येक शहरात लॉकडाऊन करण्यात आलं. पण तरीदेखील कोरोनाचा धोका काही थांबवण्याचं नाव घेत नाहीये.

Published by: Sandip Parolekar
First published: September 24, 2020, 2:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading