मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नवी मुंबईत कोरोनामुळे 72 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, गरोदर महिलेलाही लागण

नवी मुंबईत कोरोनामुळे 72 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, गरोदर महिलेलाही लागण

धक्कादायक म्हणजे घणसोलीत एका गरोदर महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. घणसोली 1, नेरुळ 2 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे.

धक्कादायक म्हणजे घणसोलीत एका गरोदर महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. घणसोली 1, नेरुळ 2 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे.

धक्कादायक म्हणजे घणसोलीत एका गरोदर महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. घणसोली 1, नेरुळ 2 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे.

नवी मुंबई, 5 एप्रिल: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 748 झाली आहे. तर मृतांचा आकडा 45 वर पोहोचला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मुंबईत 30 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मुंबई शहराची इतर राज्यांशी तुलना केल्यास ही संख्या खूप जास्त आहे. सध्या मुंबईत एकूण 458 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यात नवी मुंबईत कोरोनामुळे 72 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून एका गरोदर महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. हेही वाचा.. लॉकडाऊनमध्ये घरपोच दारू देतो सांगून 30 हजारांचा ऑनलाइन गंडा कोरोनामुळे 72 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू दुसरीकडे, नवी मुंबईत मृतांचा आकडा आता 2 झाला आहे. एका 72 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मृत नागरिक नेरुळ येथे राहणारा असून तो पॉझिटिव्ह होता. तसेच नवी मुंबईत रविवारी दिवसभरात आणखी 3 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 28 वर पोहोचला आहे. धक्कादायक म्हणजे घणसोलीत एका गरोदर महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. घणसोली 1, नेरुळ 2 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. हेही वाचा.. EXCLUSIVE VIDEO: एका क्षणात इतिहास जमा झाला ऐतिहासिक अमृतांजन ब्रिज 30 जणांचा बळी, 103 पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची नोंद मुंबईत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला असून गेल्या तीन दिवसांत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तिघांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची तपासणी केली जात आहे. मृत्यू झालेल्यांमधील 6 जणांना दीर्घकालीन आजार होता. तर यापैकी 2 जणं वृद्ध होते. आज मृत्यू झालेल्यांमध्ये 7 जण हे पुरुष असून 1 महिला होती. यांचे वय 50 ते 80 या दरम्यान असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.ऑसध्या देशात कोरोनाबाधितांचा आकडा 3000 च्या पार गेला असून 75 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा...शाळा-कॉलेजचं लॉक कधी निघणार? परीक्षांचे काय होणार याबद्दल सरकारनं दिली माहिती कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केलं आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी लॉकडाऊनचं उल्लंघन होत असल्याचं दिसून येत आहे. काल आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. धारावी या भागात तब्बल 7 ते 8 लाख नागरिक राहतात. त्यामुळे अशा ठिकाणी कोरोनाचा फैलाव जलद गतीने होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाने 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याचं सांगितले असले तरी रुग्णांची संख्या कमी न झाल्यास ही मर्यादा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दिल्लीतील निजामुद्दीन जमात या कार्यक्रमातील अनेक सदस्यांनी मुंबईतील धारावीत वास्तव्य केल्याचे समोर आल्यानंतर भीती वाढली आहे.
First published:

Tags: Symptoms of coronavirus

पुढील बातम्या