मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /BREAKING : बुलडाण्यापाठोपाठ उस्मानाबादेत omicron ची एंट्री, 2 रुग्ण आढळले

BREAKING : बुलडाण्यापाठोपाठ उस्मानाबादेत omicron ची एंट्री, 2 रुग्ण आढळले

युएईहुन बावी येथे आलेला रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे बावीत कलम 144 लागू...

युएईहुन बावी येथे आलेला रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे बावीत कलम 144 लागू...

युएईहुन बावी येथे आलेला रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे बावीत कलम 144 लागू...

उस्मानाबाद, 15 डिसेंबर :  कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या राज्यात वाढत चालली आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ आता विदर्भ, मराठवाड्यात ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. बुलडाण्यापाठोपाठ (buldhana)  आता उस्मानाबादमध्येही (osmanabad) दोन रुग्ण आढळून आले आहे. तर राज्यात आज एकूण 4 नवीन रुग्ण आढळले आहे. राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 32 वर पोहोचली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. युएईहुन बावी येथे आलेला रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे बावीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. शारजा,युएई (संयुक्त अरब अमिरात) हुन उस्मानाबाद जिल्ह्यात आलेला 42 वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पण त्याच्या संपर्कात आलेल्या  रुग्णाचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सायबेरियामध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद! WMO चा जगाला इशारा

उस्मानाबाद आरोग्य विभागाने 5 नमुने ओमायक्रॉन चाचणीसाठी पाठविले होते त्यापैकी 2 अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले आहे.  बावी येथील तरुण व त्याच्या घरातील एकजण पॉझिटिव्ह आढळला आहे. बावी येथील या तरुणाच्या संपर्कातील आणखी काही जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, मात्र त्यांचा ओमायक्रॉन अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

विदर्भात ओमायक्रॉनग्रस्त दुसरा रुग्ण आढळला

तर दुसरीकडे, दुबईवरून बुलडाण्यात परतलेल्या त्या 65 वर्षीय गृहस्थाची ओमायक्रॉन चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. अर्थात संबंधीत रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांना कुठलीही लक्षणे नसली तरी एकूण १४ दिवस निरीक्षणात ठेवण्यात येणार नाही. दिलासादायक बाब म्हणजे, संबंधीत व्यक्तीच्या संपर्कातील सर्व व्यक्ती कोरोना निगेटीव्ह आहेत. मागील 9 डिसेंबर रोजी दुबईवरून आलेले हे गृहस्थ कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर त्यांचा स्वॅब नमुना पुणे येथे ओमायक्रॉन चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. चार दिवसानंतर हा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. तो ओमायक्रोन पॉझिटीव्ह आला आहे.

OBC Reservation : राज्य सरकारला आणखी एक धक्का, निवडणुका होणारच!

ओमायक्रॉनग्रस्त ही व्यक्ती ठणठणीत असून १४ दिवसांच्या प्रोटोकॉलनंतर त्यांना सुटी देण्यात येणार आहे. मात्र ओमायक्रॉनचा बुलडाणा जिल्ह्यात शिरकाव झाल्याचे स्पष्ट आहे. विदर्भतील दुसरा रुग्ण बुलडाण्यात आढळला असल्याचे स्पष्ट झाले आहे हा रुग्ण दुबईवरून आलेला होता, आता रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.

First published:
top videos