बीड, 15 सप्टेंबर: ऊसतोड मजूर संदर्भातील लवाद आता कालबाह्य झाला आहे, सरकारनं इथून पुढे लवाद रद्द करून समिती नेमावी, अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. लवादाच्या नेत्याची आम्हाला भूमिका मान्य नाही. त्यामुळं सरकारनं मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, असं स्पष्ट सांगत आमदार विनायक मेटे यांनी नामोल्लेख न करता पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा...मोठी बातमी! उदय सामंत यांना ABVP च्या पदाधिकाऱ्याकडून धमकीचा फोन?
आमदार विनायक मेटे यांनी बीड येथे पत्रकारांशी संवाद साधला. आमदार मेटे म्हणाले की, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ऊसतोड मजुरांना वाली राहिला नाही. आजच्या ऊसतोड मजूर नेत्यांनी मजुरांवर अन्याय केले .निझामाच्या काळात नव्हता तितका या सरकारच्या काळात अन्याय ऊसतोड मजुरावर झाला आहे. तो थांबवण्यासाठी माथाडी कामगार कायद्याच्या धर्तीवर ऊसतोड कामगारांसाठी कायदा करा, अशी मागणी आमदार मेटे यांनी यावेळी केली.
शिवसंग्राम प्रणित महाराष्ट्र ऊसतोड कामगार मुकादम वाहतुकदार संघटना आणि महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषद घेतली आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह शाळा किमान 100 सुरू करा, पंचायत समिती गणात एक करवी तसेच विद्यमान गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर महामंडळ सुरू करा, परळी येथील मुख्यालय लवकरात लवकर अद्ययावत स्थापन करावे, अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली आहे.
ऊस कामगारांच्या कोयत्याला न्याय नक्कीच मिळेल...
ऊसतोड कामगारांसाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणजे, 'कामगारांच्या कोयत्याला न्याय नक्कीच मिळेल.'
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचा ऊसतोड कामकारांनाही फटका बसला आहे. सहकारी साखर कारखाने बंद असल्यानं ऊसतोड कामगारांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना आधार मिळावा यासाठी पंकजा मुंडे प्रयत्नशील असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
कोयत्याला मिळेल न्याय; ऊसतोड कामगारांनी विश्वास ठेवावा. खा.शरद पवार साहेब, जयंत पाटील, दांडेगावकर चेअरमन साखर कारखाना संघ यांच्याशी चर्चा करणार.@PawarSpeaks@Jayant_R_Patil
हेही वाचा...'वंचितच्या विनंतीला शरद पवार मान देतील', एल्गारप्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी पवारांना केलं जाहीर आवाहन
'माझ्या ऊसतोड मजूर बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब, कारखानदारांचे प्रतिनिधी जयंत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी विश्वास ठेवावा. आपल्या कोयत्याला न्याय नक्कीच मिळेल. तथापि, कोयत्याची धार आणि सन्मान सांभाळण्याची जबाबदारी ऊसतोड कामगार आणि मुकादमांवर देत आहे,' असंही पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.